VIDEO : PM मोदींच्या बसवरील फोटोचं चुंबन घेत शेतकऱ्याला रडू कोसळलं, भरपूर आशीर्वाद दिले; जाणून घ्या काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 05:43 PM2023-03-30T17:43:17+5:302023-03-30T17:48:33+5:30
संबंधित व्यक्ती कर्नाटकमधील एक शेतकरी असल्याचे बोलले जात आहे. बसवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो पाहून ही व्यक्ती अत्यंत भावूक झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
नवी दिल्ली - सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो पाहून एका व्यक्तीला आपल्या भावनां अनावर झाल्याचे दिसत आहे. बसवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरून ही व्यक्ती सर्वप्रथम हात फिरवते. मग प्रेमाने या फोटोचे चुंबन घेते. पंतप्रधान मोदींना भरभरून आशीर्वाद देते. आपल्या पोस्ट ऑफिसच्या खात्यात 1000 रुपये आल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानते. जगाचं मनं जिंकणारे पंतप्रधान, असे मोदींचे वर्णन करते. हा व्हिडिओ कर्नाटक मधील आहे.
संबंधित व्यक्ती कर्नाटकमधील एक शेतकरी असल्याचे बोलले जात आहे. बसवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो पाहून ही व्यक्ती अत्यंत भावूक झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी ही व्यक्ती पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामाचा पाढा वाचत कौतुक करत आहे.
व्हिडिओमध्ये हा शेतकरी म्हणतो, "पंतप्रधान मोदींनी त्यांना सर्व काही दिले आहे. त्यांच्या पोस्ट ऑफिस खात्यात 1000 रुपये आले आहेत. पीएम मोदींनी त्यात आणखी 500 रुपयांची वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंद आला आहे. पीएम मोदींनी वार्षाला 5 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधानांनी संपूर्ण जग जिंकले आहे. आपण त्यांना नमन करतो."
@narendramodi@PMOIndia@AmitShah@ANI@anandmahindra@republic@BJP4India A farmer in Karnataka has shown
— MOHANDAS KAMATH (@MOHANDASKAMATH3) March 28, 2023
his deep affection for and
gratitude to our beloved Prime Minister in an emotional video. pic.twitter.com/DR3g0FVE7M
हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रती लोकांच्या मनात किती प्रेम आहे, हे दर्शवणारा हा व्हिडिओ आहे. एवढेच नाही, तर केंद्र सरकरच्या योजनांचा फायदा सर्वसामान्यांपर्यंत, अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येते. महत्वाचे म्हणजे, गावाकडील लोकांना या योजनांचा फायदा फार सहजपणे मिळाला आहे.