Farmers Protest : "सरकारच्या मौनातून शेतकरी आंदोलनाविरोधात मोठं पाऊल उचलण्याची तयारी", राकेश टिकैत यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 12:19 IST2021-03-02T11:43:45+5:302021-03-02T12:19:52+5:30
Rakesh Tikait And Farmers Protest : केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध शेतकरी आंदोलन सुरू आहे. याच दरम्यान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी गंभीर आरोप केला आहे.

Farmers Protest : "सरकारच्या मौनातून शेतकरी आंदोलनाविरोधात मोठं पाऊल उचलण्याची तयारी", राकेश टिकैत यांचा गंभीर आरोप
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत गेल्या कित्येक दिवसांपासून केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध शेतकरी आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. याच दरम्यान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी गंभीर आरोप केला आहे. "सरकारच्या मौनातून शेतकरी आंदोलनाविरोधात मोठं पाऊल उचलण्याची तयारी" असल्याचं म्हटलं आहे. मोदी सरकारवर संशय व्यक्त केला आहे. शेतकरी आंदोलनाविरोधात केंद्र सरकार काहीतरी करत आहे. सरकारच्या मौनातून शेतकरी आंदोलनाविरोधात लवकरच काहीतरी होणार याचे संकेत मिळत आहेत असं टिकैत यांनी म्हटलं आहे.
"गेल्या 15-20 दिवसांपासून सरकार गप्प आहे. सरकार कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची तयारी आहे. केंद्राचे नवीन कृषी कायदे लागू होत नाही तोपर्यंत दिल्लीतून मागे हटणार आहे. आंदोलन कधी संपवायचं या निर्णय आता केंद्र सरकारने घ्यायचा आहे. तसेच सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यास शेतकरी आपल्या गावी परततील. असं झालं नाही तर शेतकरी शेतीही पाहतील आणि आंदोलनही करतील" असं देखील राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये अनेकदा चर्चा झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
"देशाचं धोरण संसदेतून नव्हे तर रस्त्यावरून बदलू", राकेश टिकैत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोलhttps://t.co/RjTVG8Jkbr#FarmersProstests#FarmersBill2020#RakeshTikait#NarendraModi#LalKrishnaAdvanipic.twitter.com/D6PEni8Y9p
— Lokmat (@MiLOKMAT) February 16, 2021
सिंघू, टिकरी बॉर्डरवरची गर्दी ओसरली पण शेतकरी नेत्यांनी आंदोलनाबाबत केला मोठा दावा, म्हणाले...
राकेश टिकैत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीही चर्चेतूनच शेतकऱ्यांच्या समस्येवर तोडगा निघेल असं म्हटलं आहे. मात्र अद्यापर्यंत केंद्र सरकारने चर्चेचा कुठलाही प्रस्ताव शेतकरी संघटनांना मिळालेला नाही. पण सरकारने बोलावल्यास आम्ही चर्चेसाठी तयार आहोत असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवरील शेतकर्यांच्या प्रमुख आंदोलनाच्या ठिकाणी गर्दी ओसरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मात्र आता शेतकरी नेत्यांनी आंदोलन पूर्वीपेक्षा अधिक बळकट होत असल्याचा दावा केला आहे. दिल्लीच्या सीमेवर लंगर आणि तंबू रिकामे असूनही आंदोलनाला अधिक गर्दी होत असल्याचं शेतकरी नेते सांगत आहेत. आंदोलनाला बळ देण्यासाठी गर्दी एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसच्या महिला नेत्याचं वादग्रस्त विधान, भरसभेत घसरली जीभhttps://t.co/hC8nPhkkRW#FarmersProtests#farmersbill2020#Congresspic.twitter.com/J3xtJIToZT
— Lokmat (@MiLOKMAT) February 15, 2021
"अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन करणारे लालकृष्ण अडवाणी हे आंदोलनजीवी होते का?"
पंतप्रधान मोदींच्या आंदोलनजीवी टीकेवरही टिकैत यांनी हल्लाबोल केला असून एक प्रश्न विचारला आहे. राकेश टिकैत यांनी "अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन करणारे लालकृष्ण अडवाणी हे आंदोलनजीवी होते का?" असा प्रश्न उपस्थित केला आहे. टिकैत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना असं म्हटलं आहे. यावेळी टिकैत यांना त्यांच्या अश्रूंबाबत देखील प्रश्न विचारला गेला. तेव्हा हे शेतकर्यांचे अश्रू आहेत, भीतीचे नाहीत. 26 जानेवारीला पोलिसांसमोर गुंड होते. ते लाठ्या चालवत होते. पोलिसांच्या बॅरिकेड्समध्ये लाठ्या घेऊन कोण आलं होतं हे पोलिसांनी सांगावं असं देखील म्हटलं आहे. शेतकरी आणि आपल्यात फक्त एका फोन कॉलचं अंतर आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी शेतकरी नेत्यांना चर्चेचं आवाहन केलं होतं. त्यावर देखील राकेश टिकैत यांनी उत्तर दिलं. आम्ही कोणाशी चर्चा करायची. आम्हाला कोणताही प्रस्ताव मिळालेला नाही.
"शेतकऱ्यांना मुद्दा बनवणाऱ्या काँग्रेसने अनेक राज्यांत शेतकऱ्यांची फसवणूक केली"https://t.co/TbziQbfltL#NirmalaSitharaman#RahulGandhi#Congresspic.twitter.com/DNInnxLYmS
— Lokmat (@MiLOKMAT) February 13, 2021