शेतकरी नेते राकेश टिकैत यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नोएडाला जात असताना कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 05:09 PM2024-12-04T17:09:46+5:302024-12-04T17:10:32+5:30

Rakesh Tikait News: भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांना अलिगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राकेश टिकैत हे शेतकरी नेत्यांच्या एका बैठकीत सहभागी होण्यासाठी नोएडा येथे जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे.

Farmer leader Rakesh Tikait was detained by the police, action was taken while going to Noida | शेतकरी नेते राकेश टिकैत यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नोएडाला जात असताना कारवाई

शेतकरी नेते राकेश टिकैत यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नोएडाला जात असताना कारवाई

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांना अलिगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राकेश टिकैत हे शेतकरी नेत्यांच्या एका बैठकीत सहभागी होण्यासाठी नोएडा येथे जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे. राकेश टिकैत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यमुना एक्स्प्रेवेवर पुढे जाण्यापासून रोण्यात आल्यानंतर टिकैत यांना टप्पल पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. राकेश टिकैत यांना केवळ ताब्यात घेण्यात आलं आहे, त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही, असे पोलिसांच्या एका अधिकृत प्रवक्त्याने सांगितले आहे.  

या कारवाईबाबत राकेश टिकैत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पोलीस शेतकऱ्यांना आपापल्या घरात राहण्यास सांगून त्यांना गौतमबुद्धनगर, नोएडा आदी भागात जाण्यापासून रोखत आहेत. अशा प्रकारे तुम्ही आम्हाला कधीपर्यंत ताब्यात ठेवणार आहात. तुम्ही आम्हाला कोंडून ठेवलं तर तुम्ही बोलणार कुणाबरोबर? अधिकाऱ्यांची हीच भूमिका  कायम राहिली. तर शेतकऱ्यांचं आंदोलन अधिक तीव्र होईल.  

भारतीय किसान युनियनने मंगळवारी नरेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली मुझफ्फरनगर मधील सिसौली गावातील किसान भवन येथे एक आपातकालीन बैठक बोलावण्यात आली होती.. तसेच जमिनीची मोबदल आणि इतर मागण्यांसाठी नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.     

Web Title: Farmer leader Rakesh Tikait was detained by the police, action was taken while going to Noida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.