Farmer protest : शेतकरी आंदोलनावर सचिन, कोहलीसह क्रिकेटर्सचे ट्विट्स कसे? काँग्रेस नेते म्हणतात...

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 4, 2021 09:45 AM2021-02-04T09:45:23+5:302021-02-04T09:50:29+5:30

या संपूर्ण प्रकरणावरून काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी बीसीसीआयवर गंभीर आरोप केला आहे.

Farmer protest Congress leader karti chidambaram slam bcci over cricketers tweets Rihanna greta thunberg Sachin Kumble Virat | Farmer protest : शेतकरी आंदोलनावर सचिन, कोहलीसह क्रिकेटर्सचे ट्विट्स कसे? काँग्रेस नेते म्हणतात...

Farmer protest : शेतकरी आंदोलनावर सचिन, कोहलीसह क्रिकेटर्सचे ट्विट्स कसे? काँग्रेस नेते म्हणतात...

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांहूनही अधिक काळापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे.यासंदर्भात पॉपस्टार रिहाना, मिया खलीफा (आधीची पोर्न स्टार) आणि ग्रेटा थनबर्ग आदींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे.यासंदर्भात आता माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरपासून ते अनिल कुंबळेपर्यंत आणि विराट कोहलीपासून ते शिखर धवनपर्यंत आदिंनीही ट्विट केले आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांहूनही अधिक काळापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात पॉपस्टार रिहाना, मिया खलीफा (आधीची पोर्न स्टार) आणि ग्रेटा थनबर्ग आदींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे. यानंतर आता माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरपासून ते अनिल कुंबळेपर्यंत आणि विराट कोहलीपासून ते शिखर धवनपर्यंत आदिंनी सरकारच्या बाजूने उभे राहत शेतकरी आंदोलनावरून सरकारवर टीका करणाऱ्या परदेशी सेलिब्रेटींना फटकारले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावरून काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी बीसीसीआयवर गंभीर आरोप केला आहे.

"बीसीसीआय आपल्या क्रिकेटर्सना शेतकरी आंदोलनासंदर्भात जबरदस्तीने ट्विट करायला लावत आहे. हे अत्यंत बालीशपणाचे आहे. बीसीसीआयने हे थांबवायला हवे. नव्हे बीसीसीआयने, असे करू नये," असे कीर्ती चिदंबरम यांनी म्हटले आहे. कार्ती हे माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र आहेत. 

इतरांनी हस्तक्षेप करू नये- सचिन तेंडुलकर
यासंदर्भात, "भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगले ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा, असे ट्विट सचिन तेंडुलकरने केले आहे. तसेच त्यांने आपल्या ट्विटमध्ये #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या हॅश टॅग्सचाही वापर केला आहे.

Farmer Protest: सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर अन् विराट कोहलीनं केलं सरकारच्या समर्थनार्थ ट्विट

भारत आपले प्रश्न सोडवू शकतो - कुंबळे
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून, भारत आपले अंतर्गत प्रश्न शांततेने सोडवू शकतो, असे अनिक कुंबळे यांनी म्हटले आहे.

कंगना नंतर क्रिकेटर प्रज्ञान ओझानंही पॉप स्टार रिहानाला फटकारलं, दिलं असं उत्तर

शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य घटक -
विराट कोहलीने लिहिलं आहे की, "मतभेदांच्या या काळात आपण सर्वजण एकत्र राहू या. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य घटक आहे आणि मला खात्री आहे की सर्व बाजूंनी एक समाधानकारक तोडगा काढला जाईल जेणेकरून शांतता टिकेल आणि आम्ही सर्वजण पुढे जाऊ असं त्याने म्हटलं आहे.

राजकारण तापलं, प्रियांका गांधी ट्रॅक्टर रॅलीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटणार

सलामीवीर शिखर धवनने ट्विट करत म्हटलं आहे, “एका निष्कर्षापर्यंत पोहोचणे सध्या आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. उद्याच्या भविष्यासाठी आपण एकत्रीतपणे पुढे चालूया.

रिहानानं विचारलं शेतकरी आंदोलनावर चर्चा का नाही? कंगना भडकली; म्हणाली - 'क्योंकि वो...!'

शेतकरी आंदोलनावरून देशाबाहेरील व्यक्तींनी केलेल्या ट्विट्सवर भारताच्या परराष्ट्रमंत्रालयानेही कठोर भूमिका घेतली आहे. हे बेजबाबदारपणाचे असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच गृहमंत्री अमित शाह यांनीही कुठल्याही प्रकारचा अपप्रचार देशाची एकात्मता तोडू शकत नाही, असे म्हटले आहे.

Web Title: Farmer protest Congress leader karti chidambaram slam bcci over cricketers tweets Rihanna greta thunberg Sachin Kumble Virat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.