Farmer Protest : शेतकरी आंदोलन काळात पंजाबमध्ये पाकिस्तानमधून अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 04:44 AM2021-01-31T04:44:39+5:302021-01-31T07:07:30+5:30

Farmer Protest News Update : पंजाब अशांत करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे, असा सावधगिरीचा इशारा पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी केंद्र सरकारला दिला.

Farmer Protest: Drug smuggling from Pakistan increases in Punjab during the Farmer agitation | Farmer Protest : शेतकरी आंदोलन काळात पंजाबमध्ये पाकिस्तानमधून अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ

Farmer Protest : शेतकरी आंदोलन काळात पंजाबमध्ये पाकिस्तानमधून अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ

googlenewsNext

चंदीगड :  नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाले, तेव्हापासून पाकिस्तानातून भारतात शस्त्रास्त्रे व अमली पदार्थांच्या तस्करीतही वाढ झाली आहे. पंजाब अशांत करण्याचा  पाकिस्तानचा डाव आहे, असा सावधगिरीचा इशारा पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी केंद्र सरकारला दिला.

अमरिंदरसिंग म्हणाले, ‘पाकिस्तानातून सध्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या तस्करीमागे काही कारस्थान असण्याची शक्यता आहे. त्याची केंद्र सरकारने सखोल चौकशी केली पाहिजे. 

पाकिस्तान पंजाबमध्ये विविध प्रकारांनी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे. याबद्दल अनेक दिवसांपासून मी केंद्र सरकारला सातत्याने माहिती कळवत आहे. पाकिस्तानचे भारतामध्ये स्लीपर सेल असून, त्यांच्या मदतीने पंजाबमध्ये अशांतता पसरविण्याचा उद्योग केला जात आहे.’  ते म्हणाले की, पंजाबच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तान आहे तर उत्तर सीमेवर चीन आहे.  

तस्करीसाठी ड्रोनचा वापर
 पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग म्हणाले, पाकिस्तानातून ड्रोनद्वारे पंजाबमध्ये अमली पदार्थ व शस्त्रास्त्रांची तस्करी केली जाते. ही सारी माहिती देण्यासाठी मी काही महिन्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटलो होतो. 
भारतीय सुरक्षा जवानांनी पाकिस्तानमधून पंजाबमध्ये आलेले ३० ड्रोन पकडले; पण न पकडल्या गेलेल्या ड्रोनची संख्याही २०-३०च्या आसपास आहे.

Web Title: Farmer Protest: Drug smuggling from Pakistan increases in Punjab during the Farmer agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.