Farmer Protest: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघणार?; चर्चा होण्यासाठी पडद्यामागूनही प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 03:25 AM2021-02-09T03:25:22+5:302021-02-09T03:25:56+5:30

नवीन कृषी कायद्यांमध्ये काही दुरुस्त्या करण्यास तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.

Farmer Protest likely to be resolved government trying for discussion | Farmer Protest: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघणार?; चर्चा होण्यासाठी पडद्यामागूनही प्रयत्न

Farmer Protest: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघणार?; चर्चा होण्यासाठी पडद्यामागूनही प्रयत्न

Next

- हरिश गुप्ता

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात उग्र आंदोलन करणारे शेतकरी व हे कायदे राबवायचेच या गोष्टीवर ठाम असलेले केंद्र सरकार यांनी आपापल्या भूमिकांना काहीशी मुरड घालली आहे. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोन्ही बाजूंच्या भूमिकेत बदल घडविण्यासाठी पडद्यामागून अनेक प्रयत्न सुरू आहेत.

नवीन कृषी कायद्यांमध्ये काही दुरुस्त्या करण्यास तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. चक्का जामच्या दिवशी पंजाब, हरयाणा वगळता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला इतर राज्यांत खूप मोठा प्रतिसाद मिळाला नव्हता. 

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर शेतकरी नेत्यांच्या सतत संपर्कात आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. नवीन कृषी कायद्याच्या प्रश्नाचा तिढा लवकरच सुटेल अशी आशा नरेंद्रसिंह तोमर यांनीही व्यक्त केली होती. मात्र पडद्यामागून नेमके काय प्रयत्न सुरू आहेत याची माहिती पंतप्रधानांनी उघड केली नव्हती.

भाजपचे नेते शेतकरी नेत्यांच्या संपर्कात
यासंदर्भात भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, भाजपचे काही नेते राकेश टिकैत व नरेश टिकैत यांच्या संपर्कात असून नेमका काय तोडगा काढता येईल याचा वेध घेत आहेत. 
नवीन कृषी कायद्यांमध्ये नेमक्या काय सुधारणा करता येतील याबद्दलच्या आराखड्यावर भाजप नेते पडद्यामागे टिकैत बंधुंशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

Web Title: Farmer Protest likely to be resolved government trying for discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.