Farmer Protest: सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर अन् विराट कोहलीनं केलं सरकारच्या समर्थनार्थ ट्विट
By प्रविण मरगळे | Published: February 4, 2021 08:12 AM2021-02-04T08:12:04+5:302021-02-04T08:14:28+5:30
रिहानानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस, पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केले
दिल्ली – गेल्या २ महिन्यापासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता आंतरराष्ट्रीय स्तरातून अनेक सेलिब्रिटी पाठिंबा देत ट्विट करत आहेत. त्यामुळे आता बॉलिवूड आणि क्रीडा जगतातील अनेक प्रसिद्ध चेहरे सोशल मीडियावर या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त करत आहेत. आंतरराष्ट्रीय गायिका रिहानाने ट्विटरवरून शेतकरी आंदोलनाबाबत आपण का बोलत नाही? असा सवाल केला त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची चर्चा झाली.
रिहानानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस, पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केले. मीना हॅरिसनं लिहिलं की, आपण सगळ्यांनी भारतात इंटरनेट शटडाऊन आणि शेतकरी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा हिंसाचार याचा निषेध व्यक्त केला पाहिजे. ट्विटरवरून गेल्या २४ तासांत रिहानाच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केलं आहे.
#IndiaTogether#IndiaAgainstPropagandahttps://t.co/TfdgXfrmNtpic.twitter.com/gRmIaL5Guw
— Anurag Srivastava (@MEAIndia) February 3, 2021
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय की, भारताच्या संसदेने व्यापक चर्चा आणि संवादानंतर कृषी क्षेत्राच्या संबंधित सुधारणा करणारे कायदे मंजूर केले आहेत. हा कायद्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लवचिकता आणि विस्तीर्ण बाजारपेठ मिळू शकेल. ही सुधारणा आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत शेतीचा मार्ग आहेत. भारतातील काही भागातील शेतकऱ्यांचा छोटा गट या सुधारणांशी सहमत नाही. भारत सरकारने आंदोलकांच्या भावनांचा आदर करून त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद सुरू केला आहे. या प्रयत्नात आतापर्यंत अकरा फेऱ्या झाल्या आहेत. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री सहभाग घेत आहेत, केवळ सरकारच नाही,तर पंतप्रधानांकडूनही कृषी कायद्याला स्थगित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करताना #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropagenda हा हॅशटॅग वापरला आहे.
गृहमंत्री अमित शहा म्हणाले....
परराष्ट्र मंत्रालयाच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, कोणताही दुष्प्रचार भारताच्या ऐक्याला धक्का पोहचवू शकत नाही, त्याचसोबत भारताला नव्या शिखरावर जाण्यापासून रोखू शकत नाही. भारताचं भविष्य अपप्रचाराने नव्हे तर प्रगतीने निश्चित होणार आहे, भारत विकासासाठी एकजुट आहे असं म्हटलं आहे. तर माजी क्रिकेटर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही हॅशटॅग वापरत ट्विट केले आहे. भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. भारतात जे काही घडत आहे, बाह्य शक्ती त्याचे प्रेक्षक होऊ शकतात परंतु सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि त्यांनीच निर्णय घ्यावा, चला एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया. असं आवाहन सचिन तेंडुलकरने केले आहे.
India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 3, 2021
Indians know India and should decide for India. Let's remain united as a nation.#IndiaTogether#IndiaAgainstPropaganda
त्याचसोबत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही सरकारच्या भूमिकेचे स्वागत करत म्हटलंय की, "भारत एक गौरवशाली राष्ट्र आहे. एक भारतीय म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की, एक राष्ट्र म्हणून आम्ही कोणत्याही समस्या किंवा अडचण जनहिताच्या भावनेने सोडविण्यास पूर्णपणे सक्षम आहोत. जय हिंद असं सांगत त्यांनीही या दोन हॅशटॅगचा वापर केला आहे. त्याचसोबत भारतीय कॅप्टन विराट कोहलीनेही ट्विट केलं आहे.
#IndiaTogether#IndiaAgainstPropagandapic.twitter.com/JpUKyoB4vn
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) February 3, 2021
विराट कोहलीने लिहिलं आहे की, "मतभेदांच्या या काळात आपण सर्वजण एकत्र राहू या. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि मला खात्री आहे की सर्व बाजूंनी एक समाधानकारक तोडगा काढला जाईल जेणेकरून शांतता टिकेल आणि आम्ही सर्वजण पुढे जाऊ असं त्याने म्हटलं आहे.
Let us all stay united in this hour of disagreements. Farmers are an integral part of our country and I'm sure an amicable solution will be found between all parties to bring about peace and move forward together. #IndiaTogether
— Virat Kohli (@imVkohli) February 3, 2021