तेव्हा आपणही निषेध केला होताच ना?; 'त्या' विधानावरून उर्मिला मातोंडकरांचा थेट मोदींवर बाण?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 02:58 PM2021-02-04T14:58:50+5:302021-02-04T15:01:48+5:30
शेतकरी आंदोलन अंतर्गत विषय, पण...; उर्मिला मातोंडकरांकडून सरकारचा समाचार
मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून आता ट्विटरवर वॉर सुरू झालं आहे. पॉपस्टार रिहानानं शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट करताच बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंनी 'इंडियाटुगेदर' असे हॅशटॅग वापरून ट्विट करण्यास सुरुवात केली. शेतकरी आंदोलन हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हणत सेलिब्रिटींनी बॅटिंग सुरू केली. यावर आता अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सेलिब्रिटींना अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे.
'Tweet Together'... सायना नेहवालनं अक्षय कुमारचं ट्विट जसंच्या तसं कॉपी केलं
दिल्लीच्या वेशीवर दोन महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल जगभरात घेतली जात आहे. सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे. एखाद्या गोष्टीविरोधात आवाज उठवण्यासाठी सोशल मीडिया वापरला जातो, असं मातोंडकर म्हणाल्या. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसद परिसरात धुडगूस घातला. त्यावेळी तिथल्या लोकशाहीवर झालेल्या हल्ल्याबद्दल आपण बोलतच होतो. तिथे झालेल्या घटनांचा आपण निषेध केला होता, याची आठवण मातोंडकर यांनी करून दिली.
गाझीपूर बॉर्डरवर खिळे काढतानाच्या व्हायरल व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय? पोलिसांनी सांगितलं...
अमेरिकेत सत्तांतर झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पायउतार होण्यास नकार दिला होता. त्यांच्या समर्थकांनी संसद परिसरात गोंधळ घातला. संसदेचं नुकसान केलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घडल्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली होती. तोच धागा पकडत आपणही अमेरिकेच्या अंतर्गत प्रश्नावर बोललो होतो. आपण तिथल्या हिंसाचाराचा निषेध केला होती, याकडे मातोंडकर यांनी लक्ष वेधलं.
शेतकऱ्यांचं आंदोलन हा आपला अंतर्गत विषय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारनं संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवावा. पण शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावले जाणार असतील, रस्त्यावर खिळे ठोकले जाणार असतील, तर जग बोलणारच, असं मातोंडकर म्हणाल्या. आपणही तिथल्या घटनांवर, हिंसाचारावर बोललो होतोच, असं त्यांनी पुढे म्हटलं. देश सध्या नाजूक परिस्थितीतून चालला आहे. त्यामुळे शब्द जपून वापरायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं.