शेतीच्या नुकसानीमुळे कोळवदच्या शेतकर्याच्या आत्महत्या
By admin | Published: October 18, 2016 12:37 AM2016-10-18T00:37:34+5:302016-10-18T00:37:34+5:30
जळगाव: अति पावसामुळे शेतीचे झालेले प्रचंड नुकसान व त्यातच कर्जबाजारीपणा यामुळे कोळवद, ता.यावल येथील सुनील जयकिसन चौधरी (वय ४२) या शेतकर्याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. चौधरी यांनी रविवारी दुपारी ३ वाजता वीष प्राशन केले. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना सोमवारी पहाटे चार वाजता त्यांचा मृत्यू झाला. सकाळी अकरा वाजता शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. चौधरी यांच्या पात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
Next
ज गाव: अति पावसामुळे शेतीचे झालेले प्रचंड नुकसान व त्यातच कर्जबाजारीपणा यामुळे कोळवद, ता.यावल येथील सुनील जयकिसन चौधरी (वय ४२) या शेतकर्याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. चौधरी यांनी रविवारी दुपारी ३ वाजता वीष प्राशन केले. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना सोमवारी पहाटे चार वाजता त्यांचा मृत्यू झाला. सकाळी अकरा वाजता शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. चौधरी यांच्या पात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.बाजार समितीच्या कर्मचार्याचा मृत्यूजळगाव: कृषी उत्पन्न बाजार समितीचे लिपीक नारायण महादू सोनवणे (वय ५० रा.शिरसोली, ता.जळगाव) यांचा रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. अति मद्यप्राशन केल्यामुळे प्रकृती खालावल्याने त्यांना रविवारी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळी अकरा वाजता शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.