शेतकरी आक्रमक, यूपी गेटवर हजारो जाट, गाझीपूर सीमेवर सुरक्षाव्यवस्थेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 06:12 AM2020-12-26T06:12:21+5:302020-12-26T06:12:50+5:30

Farmers Protest : नाताळ आणि लागून शनिवार, रविवार असल्याने सलग तीन दिवसांची सुटी मिळाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील विविध सीमा गाठत आहेत.

Farmers aggressive, thousands of Jats at UP gate, increase in security at Ghazipur border | शेतकरी आक्रमक, यूपी गेटवर हजारो जाट, गाझीपूर सीमेवर सुरक्षाव्यवस्थेत वाढ

शेतकरी आक्रमक, यूपी गेटवर हजारो जाट, गाझीपूर सीमेवर सुरक्षाव्यवस्थेत वाढ

googlenewsNext

- विकास झाडे

नवी दिल्ली : आंदोलनाच्या ३० व्या दिवशी शेतकरी पुन्हा आक्रमक होताना दिसत आहेत. सर्वच सीमांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढत असून शुक्रवारी यूपी गेटवर आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येत जाट शेतकरी पोहोचले. कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली.
नाताळ आणि लागून शनिवार, रविवार असल्याने सलग तीन दिवसांची सुटी मिळाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील विविध सीमा गाठत आहेत. 
कायदे मागे घ्यावे म्हणून केंद्र सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत नसल्याने आंदोलन केव्हाही उग्र रूप धारण करू शकते, अशी शक्यता असल्याने सर्वच सीमांवर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली. आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या सूचना विविध राज्यांतील शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय सिंघू सीमेवर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 
आधी गोदाम नंतर
कायदे -टिकेत
मुरादाबाद येथील इकरोटिया टोल प्लाझावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी हे कायदे केवळ उद्योगपतींच्या सेवेसाठी मोदींनी बनविले आहेत. हे उद्योगपती धान्यांची साठेबाजी करण्यासाठी आधी गोदामे उभारतात. त्यानंतर हे कायदे शेतकऱ्यांवर लादले जातात, यातूनच मोदींची नीती स्पष्ट होते, अशी टीका केली. 

कायद्याचा एकतरी फायदा सांगा - केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करीत केंद्र सरकारला या कायद्याचे फायदे विचारले. एक तरी फायदा सांगावा असे त्यांनी आवाहन केले. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे निव्वळ नुकसानच आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मंत्री व खासदारांना पत्र
मंत्री आणि खासदारांना पत्र लिहून हा कायदा मागे घेण्यात यावा, अशी विनंती शेतकरी संघटना करणार आहेत. संयुक्त 
किसान मोर्चाने हा निर्णय घेतला.

अदानी-अंबानीच्या मानसिकतेतून बाहेर पडावे
महाराष्ट्रातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिल्ली येथे चाललेल्या शेतकरी आंदोलनावर टीका करीत शेतकरी खात असलेल्या अक्रोड, पिस्ता यावर भाष्य केले आहे. त्यावर संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील आणि राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकर दरेकर यांनी खरपूस समाचार घेतला. पाटील म्हणाले, अक्रोड, पिस्ता, बदाम, काजू, बेदाणा, केसर हेदेखील शेतकरीच पिकवतो. हे शेतकऱ्यांनी खाऊ नये अशा पद्धतीने मत व्यक्त करून दरेकर यांनी आपल्या बालबुद्धीचे प्रदर्शन केले आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल पिकवावा. मात्र, स्वत: उपाशी राहावे, असे भाजपच्या नेत्यांना वाटत असेल तर ते त्यांच्या विकृत मनोवृत्तीचे लक्षण आहे. भाजप सरकारने शेतकरी हिताच्या दृष्टीने हे कायदे तातडीने रद्द करावेत व शेतकऱ्यांना न्याय द्यावा. शेतकरी आंदोलनावर टीका करून आंदोलन कमकुवत करता येणार नाही. उलट ते आणखी मजबूत होईल. शेतकऱ्यांनी पिकवावे व 
अदानी-अंबानीने खावे या मानसिकतेतून भाजपने बाहेर पडणे आवश्यक आहे. 

दिल्ली- जयपूर मार्ग जाम
आंदोलनाच्या समर्थनार्थ हजारो शेतकरी शुक्रवारी दिल्ली- जयपूर मार्गावरील रेवाडी येथे उतरले. राष्ट्रीय महामार्गावर जाम लागला आहे. शेतकऱ्यांना दिल्लीला जायचे आहे; परंतु हरयाणा पोलिसांनी त्यांना अडवले असल्याने शेतकऱ्यांनी जागेवरच धरणे दिलेत.

Web Title: Farmers aggressive, thousands of Jats at UP gate, increase in security at Ghazipur border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.