शेतकरी आंदोलन संपले, आता भाजपाविरोधातील  प्रचार थांबवणार? राकेश टिकैत यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 01:36 PM2021-12-11T13:36:09+5:302021-12-11T13:36:15+5:30

Farmers Protest: शेतकरी आंदोलन संपल्यानंतर आता संयुक्त किसान मोर्चाची काय भूमिका असेल? तसेच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले राकेश टिकैत आताही विविध राज्यांमध्ये जाऊन भाजपाविरोधात प्रचार करणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वत: Rakesh Tikait यांनी दिली आहेत.

Farmers' agitation over, will anti-BJP propaganda stop now? Rakesh Tikait made it clear, he said ... | शेतकरी आंदोलन संपले, आता भाजपाविरोधातील  प्रचार थांबवणार? राकेश टिकैत यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

शेतकरी आंदोलन संपले, आता भाजपाविरोधातील  प्रचार थांबवणार? राकेश टिकैत यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Next

नवी दिल्ली - केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्टात आले आहे. केंद्राने हे कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन संपवून माघारी परतण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता संयुक्त किसान मोर्चाची काय भूमिका असेल? तसेच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले राकेश टिकैत आताही विविध राज्यांमध्ये जाऊन भाजपाविरोधात प्रचार करणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वत: राकेश टिकैत यांनी दिली आहेत.

राकेश टिकैत यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही पुन्हा आंदोलन सुरू करू. तसेच येणाऱ्या उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत मी माझ्या निर्णयाबाबत लवकरच माझ्या समर्थकांना माहिती देणार आहे. मी उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या भागांमध्ये जाणार आहे. मला कुणीही अडवू शकत नाही.  टिकैत पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी माघारी परण्यास सुरुवात केली आहे. आजपासूनच शेतकरी माघारी परतत आहेत. आंदोलन यशस्वी ठरल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आहे. एक समाधानाची भावना आहे, ही एकप्रकारे विजय यात्राच आहे.

टिकैत यांनी सांगितले की, १५ डिसेंबरपर्यंत सामान हटवले जाईल. ते हटवण्यासाठी ३ ते ४ दिवस लागलीत. मंच रविवारपर्यंत हटवण्यात येईल. गाझीपूरमध्ये एका बाजूच्या रस्त्याला १२ डिसेंबर रोजी उघडण्यात येईल. त्यांनी सांगितले की, आता सरकारशी करार झाला आहे. सरकारबाबत कुठलीही कटुता आमच्या मनात नाही. मात्र पुढे काय निर्णय घेतले जातील, हे येणारा काळच ठरवेल.

दरम्यान, आता शेतकऱ्यांनी शांततापूर्ण पद्धतीने राहावे आणि शेतीवर लक्ष द्यावे, असे आवाहन राकेश टिकैत यांनी केले आहे. एसकेएम करारांवर लक्ष ठेवेल. तसेच पुढील बैठक पुढच्या महिन्याच्या १५ तारखेला होईल, ते यादरम्यान हरियाणासह अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटतील, असेही राकेश टिकैत यांनी सांगितले. 

Web Title: Farmers' agitation over, will anti-BJP propaganda stop now? Rakesh Tikait made it clear, he said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.