Bharat Band today: कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचा भारत बंद सुरु; गाझीपूर सीमेवरील वाहतूक रोखली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 08:08 AM2021-03-26T08:08:34+5:302021-03-26T08:17:18+5:30
Farmer protest against Farm Laws, bharat bandh: दिल्लीच्या ज्या सीमांवर आंदोलन सुरु आहे त्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे. संयुक्त मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सांगितले की, रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद केली जाणार आहे. बाजारदेखील बंद केले जाणार असल्याचे ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना (Farm Laws) विरोध करण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. आज चार महिने पूर्ण होणार असल्याने संयुक्त किसान मोर्चाने १२ तासांचा भारत बंद पुकारला आहे. याचे पडसाद उत्तर भारतात दिसू लागले आहेत. दिल्ली-गाझीपूर सीमेवर आंदोलकांनी पुन्हा एकदा हायवे बंद केला आहे. (Protesters block the Ghazipur border (Delhi-UP border) in view of 12-hour 'Bharat Bandh' call by Samyukt Kisan Morcha against Centre's Farm Laws)
गाझीपूर सीमेवर शेतकरी आंदोलनाला बसल्याने पोलिसांनी वाहतूक बंद ठेवली आहे. शेतकरी रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या ज्या सीमांवर आंदोलन सुरु आहे त्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे. संयुक्त मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सांगितले की, रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद केली जाणार आहे. बाजारदेखील बंद केले जाणार असल्याचे ते म्हणाले.
Protesters block the Ghazipur border (Delhi-UP border) in view of 12-hour 'Bharat Bandh' call by Samyukt Kisan Morcha against Centre's Farm Laws pic.twitter.com/JnmmPXixJd
— ANI (@ANI) March 26, 2021
केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, एमएसपी व खरेदीवर कायदा बनवावा, शेतकऱ्यांवर दाखल केलेले सर्वप्रकारचे गुन्हे मागे घ्यावेत, वीज विधेयक, प्रदूषण विधेयक मागे घ्यावे, पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती कमी कराव्यात अशा आजच्या भारत बंदच्या मागण्या आहेत.
Ambala: Protesters block GT Road and railway track near Shahpur, in view of 12-hour 'Bharat Bandh' call by Samyukt Kisan Morcha against Centre's Farm Laws#Haryanapic.twitter.com/1D6k4qjPlN
— ANI (@ANI) March 26, 2021
व्यापाऱ्यांची संघटना चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने दुकाने, आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र, एका दिवसाच्या भारत बंदमुळे समस्या सुटणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते डॉ दर्शन पाल यांनी सर्व नागरिकांना शांततेने हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन एवढा काळ चालणे हा शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा परिणाम असल्याचे ते म्हणाले.