शेतकऱ्यांनी सीमा ओलांडली, सर्वोच्च न्यायालयात याचिका; सुरक्षा बलाचा वापर करून थांबवले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 02:33 AM2020-12-05T02:33:03+5:302020-12-05T07:39:51+5:30
सीकरी सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यांना थोपवले आहे. बॅरिकेट्स आणि दगडांनी रस्ता बंद करण्यात आला आहे;
नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे आंदोलन नवव्या दिवशीही सुरू आहे. तृणमूल कॉँग्रेसचे खा. डेरेक ओ ब्रायन यांनी शुक्रवारी सीकरी सीमेवर शेतकऱ्यांची भेट घेऊन पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवर बोलणे करून देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. शेतकऱ्यांच्या अधिकारांना उद्योगपती घरण्यांना भाजप विकत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला.
सीकरी सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यांना थोपवले आहे. बॅरिकेट्स आणि दगडांनी रस्ता बंद करण्यात आला आहे; परंतु शेतकऱ्यांना संधी मिळताच त्यांंनी सीमा ओलांडत दिल्लीकडे येण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा बलाचा वापर करून शेतकऱ्यांना थांबवावे लागले. बदरपूर सीमेवर शेतकरी धरणे देऊन बसले.
नवरदेव ट्रॅक्टरमध्ये आला मंडपात....
शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध वर्गांतील लोक स्वयंस्फूर्तीने येत आहेत. करनाल येथील एका नवरदेवाने शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आलिशान कारचा त्याग करीत ट्रॅक्टरवर मंडपात पोहोचला. नवरदेव म्हणाला, आम्ही आता शहरात स्थायी झालो असलो तरी आम्ही मूलत: शेतकरी आहोत. त्यांना पाठिंबा देण्यासाठीच ट्रॅक्टरवरून वरात काढली.