शेतकी संघावर शेतकरीचे वर्चस्व १५ पैकी १४ जागा : लकी टेलर यांची एकहाती सत्ता

By admin | Published: February 8, 2016 10:55 PM2016-02-08T22:55:22+5:302016-02-08T22:55:22+5:30

जळगाव- तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या (शेतकी संघ) निवडणुकीचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. त्यात लक्ष्मण पाटील (लकी टेलर) यांच्या नेतृत्वातील सर्वसामान्य शेतकरी पॅनलने १५ पैकी १४ जागा मिळवून वर्चस्व सिद्ध केले. विरोधातील सहकार विकास पॅनलला फक्त एक जागा मिळाली.

Farmer's dominance in farming is 14 out of 15: Lucky Taylor's monopoly power | शेतकी संघावर शेतकरीचे वर्चस्व १५ पैकी १४ जागा : लकी टेलर यांची एकहाती सत्ता

शेतकी संघावर शेतकरीचे वर्चस्व १५ पैकी १४ जागा : लकी टेलर यांची एकहाती सत्ता

Next
गाव- तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या (शेतकी संघ) निवडणुकीचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. त्यात लक्ष्मण पाटील (लकी टेलर) यांच्या नेतृत्वातील सर्वसामान्य शेतकरी पॅनलने १५ पैकी १४ जागा मिळवून वर्चस्व सिद्ध केले. विरोधातील सहकार विकास पॅनलला फक्त एक जागा मिळाली.
१५ जागांसाठी ४७ उमेदवार रिंगणात होते. सर्वाधिक १८ उमेदवार संस्था मतदारसंघात होते. गणेश कॉलनीमधील देखरेख संघाच्या सभागृहात मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अशोक बागल होते. त्यांना वासुदेव पाटील, धीरज पाटील आदींनी सहकार्य केेले.
विजयी उमेदवार असे (कंसात पॅनल) : व्यक्तीश: मतदारसंघ- रामचंद्र सीताराम पाटील, शालीक नारायण पाटील, विजय दत्तात्रेय पाटील (सर्वसामान्य शेतकरी). संस्था मतदारसंघ - अजबराव दंगल पाटील, उत्तम ओंकार सपकाळे, वाल्मीक त्र्यंबक पाटील, विजय भिकनराव सोनवणे, जयराज जिजाबराव चव्हाण, गोपाळ फकीरचंद पाटील (सर्वसामान्य शेतकरी पॅनल), नाना आत्माराम पाटील (सहकार विकास). इतर मागासवर्गीय- भगवान रामकृष्ण पाटील. एससी/एसटी- दिनेश प्रभाकर सोनवणे. व्हीजेएनटी- दिलीप भागो बाविस्कर. महिला राखीव- जानकाबाई वसंत चौधरी, मायाबाई पांडुरंग पाटील.

एक उमेदवार फक्त चार मतांनी पराभूत, गोपाळ पाटील तीन मतांनी विजयी
संस्था मतदारसंघात सर्वसामान्य शेतकरी पॅनलचे बाळकृष्ण सूर्यवंशी हे फक्त चार मतांनी पराभूत झाले. तर याच मतदारसंघात गोपाळ फकीरचंद पाटील हे तीन मतांनी विजयी झाले.


पक्षविरहीत निवडणूक
शेतकी संघ मागील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होता. या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीसह कुठल्याही पक्षाने आपले पॅनल गठीत केले नाही. सर्वसामान्य शेतकरी व सहकार विकास पॅनलमध्ये इच्छुकांनी सहभागी होत ही निवडणूक लढली.

कोट-
आम्ही कुठलाही पक्षाचा झेंडा हाती घेतला नाही. सर्वच मंडळी शेतकरी हितासाठी एकत्र आली. शेतकरी, मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवला व आम्हाला मोठे यश मिळाले. या यशामागे आमच्या पॅनलमधील सर्वच उमेदवार, आमचे सहकारी, शेतकरी यांचे मोठे योगदान आहे. पदांची निवडही सर्वांना विश्वास घेऊन केली जाईल.
-लकी टेलर, प्रमुख, सर्वसामान्य शेतकरी पॅनल

तीन गावांचे सहा उमेदवार विजयी
निवडणुकीत गाढोदे येथील रामचंद्र पाटील व गोपाळ फकीरचंद पाटील, भादली खुर्दचे नाना आत्माराम पाटील आणि भगवान पाटील तर आव्हाणे येथील जानकाबाई चौधरी व विजय पाटील हे निवडून आले आहेत.

Web Title: Farmer's dominance in farming is 14 out of 15: Lucky Taylor's monopoly power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.