सहा महिन्यानंतर राजधानीत पुन्हा शेतकऱ्यांची एंट्री, केंद्र सरकारविरोधात जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 12:12 PM2021-07-22T12:12:01+5:302021-07-22T12:18:46+5:30

Farmers Protest: दिल्ली सरकारकडून 9 ऑगस्टपर्यंत दररोज 200 शेतकऱ्यांना दिल्लीत आंदोलनाची परवानगी

Farmers 'entry in the capital again after six months, farmers' agitation on Jantar Mantar against the central government | सहा महिन्यानंतर राजधानीत पुन्हा शेतकऱ्यांची एंट्री, केंद्र सरकारविरोधात जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचे आंदोलन

सहा महिन्यानंतर राजधानीत पुन्हा शेतकऱ्यांची एंट्री, केंद्र सरकारविरोधात जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचे आंदोलन

Next
ठळक मुद्दे26 जानेवारीला लाल किल्यापर्यंत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये मोठा हिंसाचार झाला होता.

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी आज (गुरूवार, 22 जुलै) दिल्लीत संसद मार्चची सुरुवात करत आहेत. दिल्लीतील जंतर-मंतरवर 'शेतकरी संसद'द्वारे केंद्र सरकारविरोधात आंदोलन पुकारले जाईल. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी आजपासून 9 ऑगस्टपर्यंत दररोज फक्त 200 शेतकऱ्यांना आंदोलनाची परवानगी दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगिले की, दररोज 200 शेतकऱ्यांचा एक समूह पोलिसांच्या सुरक्षेत सिंघू बॉर्डरवरुन जंतर-मंतरला येईल आणि सकाळी 11 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलन करेल.

26 जानवारीला दिल्लीत झालेल्या तीव्र आंदोलनानंतरही दिल्ली सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीत आंदोलनाची परवानगी दिली आहे. ही परवानगी 22 जुलै पासून 9 ऑगस्टपर्यंत असेल. भारतीय किसान यूनियन (BKU) चे नेते राकेश टिकैत सिंघु बॉर्डरवरुन 200 शेतकऱ्यांसह जंतर-मंतरकडे रवाना झाले आहेत. जंतर-मंतरवर राकेश टिकैत शेतकरी संसदेचे आयोजन करतील आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशनावरही लक्ष्य ठेवतील.

26 जानेवारीच्या ऱॅलीत झाली होती हिंसा
यावर्षी 26 जानेवारीला लाल किल्यापर्यंत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. त्यादरम्यान आंदोलकांनी आंदोलनाला तीव्र रुप देत लाल किल्यात घुसून झेंडे फडकावले होते. तसेच, पोलिसांना मारहाणही झाली होती. त्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीत येण्याची परवानगी दिली असली तरी, यावेळेस सुरक्षेची पुर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी जंतर-मंतरवर सुरक्षेची पूर्ण तयार केली आहे. तर दिल्ली पोलिस आणि अर्धसैनिक दलाच्या 5-5 तुकड्या जंतर-मंतरवर तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच, दिल्ली पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. 

 

 

Web Title: Farmers 'entry in the capital again after six months, farmers' agitation on Jantar Mantar against the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.