फुलशेतीनं बदललं नशीब! एकेकाळी मजूरी करणारा बळीराजा दिवसाला कमावतोय हजारो रूपये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 07:23 PM2023-02-01T19:23:00+5:302023-02-01T19:24:00+5:30

सध्या उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथील एका शेतकऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Farmers of Chitrakoot in Uttar Pradesh are earning 5 to 10 thousand rupees a day through flower farming    | फुलशेतीनं बदललं नशीब! एकेकाळी मजूरी करणारा बळीराजा दिवसाला कमावतोय हजारो रूपये

फुलशेतीनं बदललं नशीब! एकेकाळी मजूरी करणारा बळीराजा दिवसाला कमावतोय हजारो रूपये

Next

नवी दिल्ली : सध्या उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथील एका शेतकऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. खरं तर चित्रकूट जिल्ह्यात फुलांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांचा चेहरा फुलला आहे. या भागात अर्थात धर्मनगरी चित्रकूटमध्ये फुलांचा खप खूप जास्त आहे. पूर्वी ही फुले इतर जिल्ह्यांतून अथवा राज्यांतून येथे येत असत, मात्र आता येथील शेतकरी स्वतः फुलांची लागवड करून चांगले उत्पन्न घेत आहेत. मात्र, फुलशेती करणारे शेतकरी याआधी परराज्यातून जाऊन मजूरी करायचे. पण आता फुलशेतीने बळीराज्याचे नशीब बदलले आहे. 

दरम्यान, पठारी भागात पीक चांगले येत नव्हते आणि जे काही पीक लावले असायचे ते खराब व्हायचे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी फुलशेती करण्याचा विचार केला आणि आता तो यशस्वी देखील झाला आहे. पूर्वी बाहेरून फुलांची आवक होत असल्याने भाविकांना महागडी फुले खरेदी करावी लागत होती. मात्र, आता चित्रकूट येथील शेतकरी फुलांची लागवड करत आहेत. त्यामुळे भाविकांना कमी पैशात फुले मिळतात. एकीकडे चांगले उत्पन्न मिळाल्याने शेतकरी आनंदी दिसत आहेत, तर दुसरीकडे भाविकांनाही आपल्या कुलदैवताची पूजा करण्यासाठी सहज फुले उपलब्ध होत आहेत. 

शेतकरी म्हणतात... 
बुंदेलखंड हा अत्यंत मागासलेला भाग असून बुंदेलखंडमध्ये अण्णांची प्रथा अधिक असल्याचे शेतकरी विजय सिंग सांगतात. तसेच इतर पिकांमध्ये खूप अडचण होती, त्यामुळे आम्हाला फुलांची लागवड जास्त सोयीची वाटली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे धार्मिक शहर असल्यामुळे चित्रकूटमध्ये फुलांचा खप जास्त आहे. पूर्वी आम्ही मजूर म्हणून काम करायचो, त्यात आम्हाला काही फायदा दिसत नव्हता. जेव्हापासून आम्ही फुलांची लागवड करायला सुरुवात केली तेव्हापासून आम्ही दररोज 5 ते 10 हजार कमावतो, असे स्थानिक शेतकऱ्याने सांगितले. खरं तर शेतकरी विजय सिंग सुमारे तीन एकर फुलांची लागवड करतात. ते सांगतात की, जेव्हापासून त्यांनी फुलांची लागवड करायला सुरुवात केली, तेव्हापासून ते इतर शेतकर्‍यांना फुलांची लागवड करण्याचा सल्ला देऊ लागले आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title: Farmers of Chitrakoot in Uttar Pradesh are earning 5 to 10 thousand rupees a day through flower farming   

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.