कष्टाचं फळ मिळालं, नशीब पालटलं; रोज 150 रुपये मजुरीसाठी भटकायचा, आता लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 04:48 PM2023-07-04T16:48:15+5:302023-07-04T16:49:38+5:30

काही वर्षांपूर्वीपर्यंत परिसरातील लोक भयभीत होऊन जगत होते. रोजगाराचे साधन नव्हते. गावातील इतर लोकांसोबत तोही रोज कामावर जात असे

farmers of jharkhand once every day wages of 100 to 150 rupees had to wander now earning lakhs | कष्टाचं फळ मिळालं, नशीब पालटलं; रोज 150 रुपये मजुरीसाठी भटकायचा, आता लाखोंची कमाई

फोटो - NBT

googlenewsNext

झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात राहणाऱ्या 39 वर्षीय ननकू उरांवने आपल्या कष्टाच्या जोरावर नशीब पालटलं आहे. ननकू याने दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वीपर्यंत परिसरातील लोक भयभीत होऊन जगत होते. रोजगाराचे साधन नव्हते. गावातील इतर लोकांसोबत तोही रोज कामावर जात असे. 150-200 रुपये मजुरी मिळायची. कुटुंब चालवणे अवघड होते. आता तो शेती करून दरवर्षी दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवतो.

ननकूप्रमाणेच रामगड जिल्ह्यातील पतरातू येथील रहिवासी असलेल्या 40 वर्षीय उर्मिला देवी यांनी आपल्या मेहनतीने आपल्या संपूर्ण कुटुंबाचं नशीब बदललं. उर्मिलाने तिच्या तीन एकर जमिनीत शेती सुरू केली आहे. आता मजुरीसाठी दूरच्या शहरात जावं लागत नाही. वर्षाला दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याने मोठी सोय झाली आहे.

कोडरमा जिल्ह्यातील मरकच्चो येथून रांची येथील आंबा महोत्सवात सहभागी होण्यासाठी आलेले सुरेंद्र मेहता सांगतात की, काही वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष होता. मात्र आता सुमारे पाच एकरमधील आंब्यामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. शेळीपालन हे देखील उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. आता त्याच्याकडे सुमारे 250 शेळ्या आहेत.

नाबार्डच्या मदतीने या शेतकऱ्यांना प्रगत रोपे, तांत्रिक सहाय्य व इतर सुविधा पुरविल्या जात आहेत. यामध्ये विविध स्वयंसेवी संस्थांचाही मोठा वाटा आहे. राज्यात 2008 मध्ये नाबार्डने बारी प्रकल्प सुरू केला. याअंतर्गत आतापर्यंत सुमारे 35 हजार शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. अत्यल्प जमीन असलेल्या अशा शेतकऱ्यांनाही नाबार्डकडून मदत दिली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे. 

Web Title: farmers of jharkhand once every day wages of 100 to 150 rupees had to wander now earning lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.