शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा ‘चलो दिल्ली’; पंजाब-हरयाणा सीमा सील, यंत्रणा अलर्टवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 06:53 AM2024-02-12T06:53:53+5:302024-02-12T06:54:22+5:30

ठिकठिकाणी काँक्रीटचे अडथळे, शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्यासह विविध  मागण्या केल्या आहेत. 

Farmers once again 'Let's Delhi'; Punjab-Haryana border sealed, system on alert | शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा ‘चलो दिल्ली’; पंजाब-हरयाणा सीमा सील, यंत्रणा अलर्टवर

शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा ‘चलो दिल्ली’; पंजाब-हरयाणा सीमा सील, यंत्रणा अलर्टवर

बलवंत तक्षक  

चंडीगड : विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. १३ फेब्रुवारीच्या प्रस्तावित  ‘चलो दिल्ली’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी पंजाब-हरयाणा सीमा शंभू येथे सील केली. सीमेवर काँक्रीटचे अडथळे, काटेरी तारा लावण्यासह दंगलविरोधी पथक तैनात केले आहे.

संयुक्त किसान मोर्चा व किसान मजदूर मोर्चासह २०० हून अधिक शेतकरी संघटनांनी मोर्चाचे आवाहन केले आहे. शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्यासह विविध  मागण्या केल्या आहेत. 

रस्त्यावर ठोकले खिळे...
आंदोलकांना दिल्लीकडे जाण्यापासून रोखण्यासाठी फतेहाबाद जिल्ह्यात पोलिसांनी काँक्रीटचे अडथळे लावले आहेत, तसेच जाखल भागात रस्त्यावर खिळे ठोकले आहेत. 

७ जिल्ह्यांत इंटरनेट बंद 
कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने हरयाणा सरकारने सात जिल्ह्यांमध्ये ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान मोबाइल इंटरनेट सेवा आणि एकत्र एसएमएस पाठवण्याची सेवा निलंबित केल्या आहेत.

केंद्र सरकार शेतकरी संघटनांशी चर्चा करत आहेत. तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. हरयाणात कोणत्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू देणार नाही. - अनिल विज, गृहमंत्री, हरयाणा.

Web Title: Farmers once again 'Let's Delhi'; Punjab-Haryana border sealed, system on alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.