"सरकार चर्चेबाबत खोटं बोलतंय", उद्या पुन्हा शेतकरी दिल्लीकडे कूच करणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 19:42 IST2024-12-07T19:32:24+5:302024-12-07T19:42:38+5:30
Farmers Protest Delhi : सरकार चर्चेबाबत खोटे बोलत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याचे सर्वन सिंग पंढेर यांनी सांगितले.

"सरकार चर्चेबाबत खोटं बोलतंय", उद्या पुन्हा शेतकरी दिल्लीकडे कूच करणार!
Farmers Protest Delhi : शेतकरी नेते सर्वन सिंग पंढेर यांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. शनिवारी सर्वन सिंग पंढेर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सरकार चर्चेबाबत खोटे बोलत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याचे सर्वन सिंग पंढेर यांनी सांगितले.
सर्वन सिंग पंढेर म्हणाले की, उद्या दुपारी 12 वाजता 101 शेतकऱ्यांचा समूह पुढे जाईल. तसेच, सरकारकडून अद्याप चर्चेचा प्रस्ताव आलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, "देशाचा विकास होत असल्याचे दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, मात्र विकासाचे निकष लावून शेतकऱ्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केले जात आहे."
दरम्यान, सरकारची धोरणे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असून कॉर्पोरेट्सच्या बाजूने झुकलेली आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच, एमएसपीला कायद्याचा दर्जा मिळावा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या पिकांची रास्त किंमत निश्चित केली जावी, अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. तसेच, वाढत्या कर्जामुळे आणि विजेच्या दरांमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकरीदिल्लीकडे कूच करणार!
शेतकऱ्यांची पुढील योजना दिल्लीकडे कूच करण्याची आहे. सर्वन सिंग पंढेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 101 शेतकऱ्यांचा एक समूह रविवारी दुपारी 12 वाजता दिल्लीला रवाना होईल. जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या गांभीर्याने घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सर्वन सिंग पंढेर यांनी स्पष्ट केले.
#WATCH | At the Shambhu border, farmer leader Sarwan Singh Pandher says, "Why are farmers being treated with brutality?... Taking cognisance of the whole situation, tomorrow at noon, a group of 101 will depart for Delhi. Our hunger strike has entered its 12th day... Our group… pic.twitter.com/4FqpLU8cEU
— ANI (@ANI) December 7, 2024
सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चा
सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चेतून अद्याप तोडगा निघाला नाही. विकासासाठी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. तर शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे की, आतापर्यंतची चर्चा केवळ दिखाव्यासाठीच राहिली असून शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.