Farmers Protest: कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा उद्या भारत बंद; देशवासियांनी सहभागी होण्याचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 06:28 AM2021-03-25T06:28:33+5:302021-03-25T08:10:26+5:30
केंद्र सरकाने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत आणि एमएसपी लागू करावा, यासाठी आंदोलन सुरू आहे.
नवी दिल्ली : २६ मार्च रोजी संपूर्ण भारतबंद यशस्वी करावा, असे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला १२० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारत बंद पुकारण्यात आला आहे.
केंद्र सरकाने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत आणि एमएसपी लागू करावा, यासाठी आंदोलन सुरू आहे. संयुक्त किसान मोर्चाचे डॉ. दर्शन पाल यांनी सांगितले की, सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत देशभरातील सर्व रस्ते आणि रेल्वे वाहतूक, सर्व बाजारपेठा आणि इतर सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील. तथापि, ज्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत त्या ठिकाणी बंदची गरज नाही. हा भारत बंद यशस्वी करून देशवासीयांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करावा.
श्री फतेहगड साहिब येथे किसान महापंचायत आयोजित करण्यात आली होती. ज्यात पंजाबच्या शेतकरी संघटना आणि धार्मिक संघटनांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. डॉ. पाल म्हणाले की, शिवमोगामध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याविरोधात बेकायदेशीर एफआयआर दाखल करण्यात आली असून, त्याचा आम्ही निषेध करतो. संयुक्त किसान मोर्चा बिहार विधानसभेत विरोधी सदस्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विरोधकांचा आवाज दाबून त्यांची बदनामी केली आहे.
दरम्यान, देशभरातील शेतकऱ्यांनी हुतात्मा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केले होते.