Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चाचा मोठा निर्णय, आता संसद भवनापर्यंत शेतकरी मोर्चा काढणार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 08:06 PM2021-03-31T20:06:18+5:302021-03-31T20:06:47+5:30

farmers will march till parliament house in first week of may : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी संसदेपर्यंत मोर्चा काढणार असल्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.

Farmers protest : farmers will march till parliament house in first week of may | Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चाचा मोठा निर्णय, आता संसद भवनापर्यंत शेतकरी मोर्चा काढणार! 

Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चाचा मोठा निर्णय, आता संसद भवनापर्यंत शेतकरी मोर्चा काढणार! 

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या नव्या तीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असेलल्या शेतकरी संघटनांनी मोठी घोषणा केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी संसदेपर्यंत मोर्चा काढणार असल्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. या मोर्चाचा दिवस व तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. (farmers will march till parliament house in first week of may)

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. सिंघु, टिकरी आणि गाजीपूरच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. शेतकरी संघटनांनी आज बैठक घेऊन असा निर्णय घेतला की, शेतकरी आपल्या मागण्या घेऊन संसदेच्या दिशेने वाटचाल करतील. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी संसदेपर्यंत मोर्चा काढतील.

("शेतकरी संघटनांनी ठरवलं तर आंदोलन लवकर संपू शकतं, केंद्र सरकार पुन्हा चर्चेसाठी तयार")

नव्या कृषी कायद्यांबाबत तोडगा काढण्यासाठी 1 डिसेंबर 2020 पासून सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या. एकामागून एक, सरकार आणि सुमारे 40 शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये 11 फेऱ्या झाल्या. मात्र, या सर्व बैठकांमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. शेतकरी आपल्या मागण्यांर ठाम आहेत. 

दरम्यान, गेल्या शनिवारी (27 मार्च) पंजाबमधील मलोट शहरात पत्रकार परिषद घेणाऱ्या भाजपा (BJP) आमदारालाही शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांनी भाजपा आमदार अरुण नारंग (Arun Narang) यांना बेदम मारहाण करत त्यांचे कपडे फाडले आणि नंतर तोंडाला काळं फासल्याची घटना समोर आली आहे. 

( संतप्त शेतकऱ्यांकडून भाजपा आमदाराला बेदम मारहाण; कपडे फाडले, शाई फेकली अन् तोंडाला फासलं काळं)

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा आमदार अरुण नारंग राज्य सरकार विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी शनिवारी मलोट येथे आले होते. मात्र ते येण्याच्या आधीपासूनच संतप्त शेतकरी भाजपा कार्यालयात त्यांची वाट पाहत होते. नारंग आपल्या कारने या ठिकाणी पोहचताच शेतकऱ्यांनी त्यांच्याभोवती गर्दी केली आणि त्यांच्यावर शाई फेकली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या कारलाही काळं फासलं आहे. अखेर पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत आमदार अरुण नारंग यांना शेतकऱ्यांच्या गर्दीतून बाहेर काढले. अरुण नारंग पंजाबमधील अबोहरमधून भाजपा आमदार आहेत. 
 

Web Title: Farmers protest : farmers will march till parliament house in first week of may

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.