‘उभ्या पिकाला आग लावू, 40 लाख ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत येऊ’, राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 04:57 PM2021-02-18T16:57:35+5:302021-02-18T17:06:05+5:30

"ट्रॅक्टरमध्ये तेल टाकून ठेवा केव्हाही दिल्लीला यावे लागू शकते. जोवर कायदे मागे घेतले जाणार नाही, तोवर घरी परतणार नाही." (Rakesh Tikait)

Farmers Protest Hisar Rakesh Tikait says 40 lakh tractors will brought to delhi  | ‘उभ्या पिकाला आग लावू, 40 लाख ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत येऊ’, राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा

‘उभ्या पिकाला आग लावू, 40 लाख ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत येऊ’, राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा

Next
ठळक मुद्दे भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी हिसारमधील खरक पुनिया येथे महापंचायत केली.इशारा देण्याच्या अंदाजात टिकैत म्हणाले आम्ही 40 लाख टॅक्ट्रर घेऊन दिल्लीत येऊ.सरकारचा गैरसमज दूर करावा लागेल. आम्ही पीकही कापणार आणि आंदोलनही करणार. 

नवी दिल्ली - एकीकडे शेतकरी देशव्यापी ‘रेल्वे रोको’ करत आहेत. तर दुसरीकडे भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी हिसारमधील खरक पुनिया येथे महापंचायत केली. यावेळी, "अजूनही परिस्थिती अशी आहे, की सरकारला वाटते, दोन महिन्यात पिकांची सोंगणी होईल आणि शेतकरी गावी परततील. शेतकऱ्यांना बलिदान द्यावे लागेल. उभ्या पिकाला आग लावू. पिकांचा निर्णय शेतकरी करतील सरकार नाही," असे टिकैत यांनी म्हटले आहे. (Hisar Rakesh Tikait says 40 lakh tractors will brought to delhi)

40 लाख टॅक्ट्रर घेऊन दिल्लीत येऊ -
टिकैत म्हणाले, हरियाणातून आपल्याला भरपूर समर्थन मिळत आहे. ही पंचायत केवळ हरियाणा पूरतीच मर्यादित नाही, तर आम्ही प्रत्येक राज्यात जाऊन पंचायत करू. आम्ही आतापर्यंत केवळ काठी दाखवली होती. आता शेतात वापरली जाणारी साधने घेऊन दिल्लीत येऊ. एवढेच नाही, तर इशारा देण्याच्या अंदाजात टिकैत म्हणाले आम्ही 40 लाख टॅक्ट्रर घेऊन दिल्लीत येऊ. सरकारचा गैरसमज दूर करावा लागेल. आम्ही पीकही कापणार आणि आंदोलनही करणार. 

... म्हणजे टिकैत यांच्या आंदोलनाचं शेतकरी हिताशी काही घेणं देणं नाही; भाजप नेत्याची टीका

दोन-दोन दिवस सरकार पंचायत करत आहे, सरकारला लाज वाटायला हवी. धान्य कुलूपबंद करण्याची यांची इच्छा आहे. धान्याच्या गोदामांना टाळे ठोकण्याची यांची इच्छा आहे. मात्र, असे केले गेले तर कुत्र्यांनाही भाकरी मिळणार नाही, असेही टिकैत म्हणाले.

किसान ट्रॅक्टर घेऊन बंगालला जातील - 
राकेश टिकैत म्हणाले, हा शेतकरी समाज आहे. ही  समुदायांची लढाई नाही. मात्र, सरकार चुकीचे समजत आहे. पहिल्यांदाच मजबुत लोकांशी सरकारचा सामना झाला आहे. सरकारने अती केले, तर हे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन बंगालकडे निघतील. तेथेही शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणाऱ्यांना नोकरीवरून काढले जात आहे. नेत्यांची पेन्शन संपुष्टात यावी यासाठीही लढाई लढू. ट्रॅक्टरमध्ये तेल टाकून ठेवा केव्हाही दिल्लीला यावे लागू शकते. जोवर कायदे मागे घेतले जाणार नाही, तोवर घरी परतणार नाही, असा इशाराही टिकैत यांनी यावेळी सकारला दिला.

भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही घेणे देणे नाही: राकेश टिकैत यांचे टीकास्त्र

हे आंदोलन मोदी सरकारच्या द्वेषाने पछाडलेले -
"श्रीराम रघुवंशी होते आणि आम्ही त्यांचेच वंशज आहोत. भाजपला श्रीरामचंद्रांशी काहीही देणे घेणे नाही," अशी टीका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे. "भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही देणं घेणं नाही ही शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची राजकीय टीका म्हणजे राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही. हे आंदोलन मोदी सरकारच्या द्वेषाने पछाडलेले आहे हे सिद्ध करते," असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

 

Web Title: Farmers Protest Hisar Rakesh Tikait says 40 lakh tractors will brought to delhi 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.