"अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन करणारे लालकृष्ण अडवाणी हे आंदोलनजीवी होते का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 09:21 AM2021-02-16T09:21:05+5:302021-02-16T09:25:45+5:30

Rakesh Tikait And Farmers Protest : शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने तिन्ही नवीन कृषी कायदे रद्द केले पाहिजेत असं टिकैत यांनी स्पष्ट केलं आहे.

Farmers Protest rakesh tikait exclusive interview on tractor march 26 jan red fort violence farmers protest | "अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन करणारे लालकृष्ण अडवाणी हे आंदोलनजीवी होते का?"

"अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन करणारे लालकृष्ण अडवाणी हे आंदोलनजीवी होते का?"

Next

नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली मात्र यावेळी काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यानंतर आता शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने तिन्ही नवीन कृषी कायदे रद्द केले पाहिजेत असं टिकैत यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच देशाचं धोरण संसदेतून नव्हे तर रस्त्यावरून बदलू असंही ते म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या आंदोलनजीवी टीकेवरही टिकैत यांनी हल्लाबोल केला असून एक प्रश्न विचारला आहे. 

राकेश टिकैत यांनी "अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन करणारे लालकृष्ण अडवाणी हे आंदोलनजीवी होते का?" असा प्रश्न उपस्थित केला आहे. टिकैत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना असं म्हटलं आहे. यावेळी टिकैत यांना त्यांच्या अश्रूंबाबत देखील प्रश्न विचारला गेला. तेव्हा हे शेतकर्‍यांचे अश्रू आहेत, भीतीचे नाहीत. 26 जानेवारीला पोलिसांसमोर गुंड होते. ते लाठ्या चालवत होते. पोलिसांच्या बॅरिकेड्समध्ये लाठ्या घेऊन कोण आलं होतं हे पोलिसांनी सांगावं असं देखील म्हटलं आहे. 

महात्मा गांधी, सरदार भगतसिंग हे आंदोलनजीवी होते का? - राकेश टिकैत

शेतकरी आणि आपल्यात फक्त एका फोन कॉलचं अंतर आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी शेतकरी नेत्यांना चर्चेचं आवाहन केलं होतं. त्यावर देखील राकेश टिकैत यांनी उत्तर दिलं. आम्ही कोणाशी चर्चा करायची. आम्हाला कोणताही प्रस्ताव मिळालेला नाही. आम्हाला जमात म्हटलं गेलं. जमात कोणाला म्हणता? आंदोलनजीवी कोणाला म्हणता? लालकृष्ण अडवाणी अयोध्येत गेले तर तेर आंदोलनजीवी झाले का? मुरली मनोहर जोशी हे आंदोलनजीवी होते का? महात्मा गांधी, सरदार भगतसिंग हे आंदोलनजीवी होते का?, असा सवाल राकेश टिकैत यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"देशभरात मार्च काढणार अन् गुजरात केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त करणार"

शेतकरी आंदोलनातील नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी एक मोठी घोषणा केली. राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच थेट केंद्र सरकारलाच आव्हान दिलं आहे. "देशभरात मार्च काढणार आणि गुजरात केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त करणार" असं म्हणत राकेश टिकैत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने हरियाणाच्या बहादूरगडमध्ये किसान महापंचायत आयोजित करण्यात आली होती. यात देशभरात मार्च काढण्याची मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली. गुजरातला मुक्त करू. कारण गुजरात हे केंद्राच्या नियंत्रणाखाली आहे. भारत स्वतंत्र आहे. पण गुजरातमधील जनता ही कैदेत आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना तुरूंगात टाकलं जात आहे असा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे. तसेच त्यांनी गुजरातमध्ये जाण्याची तारीख अजून निश्चित करण्यात आली नसल्याचं देखील म्हटलं आहे. या आंदोलनाचं राजकारण करून नका असंही टिकैत यांनी म्हटलं आहे. 

"देशात 'टिकैत फॉर्मूला' लागू करून 3 क्विंटल गव्हाची किंमत 1 तोळा सोन्याएवढी करा"

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी किमान आधारभूत किंमत अर्थात MSP बाबत एक मोठं विधान केलं आहे. राकेश टिकैत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना गव्हाची किंमत थेट सोन्याच्या किमतीशी जोडली आहे. ज्याप्रमाणे सोन्याची किंमत वाढत आहे त्यानुसार गव्हाची किंमत देखील वाढली पाहिजे असं टिकैत यांनी म्हटलं आहे. तसेच 3 क्विंटल (300 किलो) गव्हाची किंमत ही 1 तोळा सोन्याएवढी करायला हवी असंही म्हटलं आहे. यासोबतच देशात "टिकैत फॉर्मूला" लागू करा असं सांगितलं आहे. 26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर सिंघू बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनाचं केंद्र आता गाझीपूर बॉर्डर बनलं आहे. तेव्हापासून या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व राकेश टिकैत यांच्याकडे आलं आहे. अशावेळी टिकैत यांनी MSP बाबत केलेल्या विधानाला अधिक महत्व प्राप्त झालं आहे.

Web Title: Farmers Protest rakesh tikait exclusive interview on tractor march 26 jan red fort violence farmers protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.