Farmers Protest: राकेश टिकैत यांचा सरकारला अल्टीमेटम, 'या' तारखेपर्यंत कृषी कायदे मागे घ्या; अन्यथा...
By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 6, 2021 07:58 PM2021-02-06T19:58:53+5:302021-02-06T20:04:01+5:30
टिकैत म्हणाले, आम्ही सरकारसोबत कुठल्याही प्रकारच्या दबावात बोलणार नाही. जेव्हा बरोबरचा प्लॅटफॉर्म असेल, तेव्हाच चर्चा होईल. सरकारने आमचे ऐकावे, अन्यथा... (Rakesh tikait)
नवी दिल्ली - केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास 70 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यातच आता शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh tikait) यांनी केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेण्याचा अल्टीमेटम दिला आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, असे टिकैत यांनी म्हटले आहे. ते शनिवारी चक्का जामनंतर दिल्ली-यूपी गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांशी बोलत होते. (Government must repeal farm laws till 2nd october syas Rakesh tikait)
टिकैत म्हणाले, आम्ही सरकारसोबत कुठल्याही प्रकारच्या दबावात बोलणार नाही. जेव्हा बरोबरचा प्लॅटफॉर्म असेल, तेव्हाच चर्चा होईल. आम्ही सरकारला कायदे मागे घेण्यासाठी 2 ऑक्टोबर ही तारीख दिली आहे. यानंतर आम्ही पुढील योजना आखू. सरकारने आमचे ऐकावे, अन्यथा पुढच्या आंदोलनात, ज्यांची मुलं सीमेवर अथवा पोलिसात आहेत, त्यांचे कुटुंबीय येथे असतील. त्यांचे वडिल त्यांचा फोटो घेऊन येथे बसतील. फोट केव्हा घेऊन यायचे हेही मी सांगेन.
खूशखबर! PM किसान सन्मान स्कीमशी जोडली गेली KCC योजना; 175 लाख अर्ज मंजूर, मिळवा मोठा फायदा
मग म्हणून नका, हे कसे आंदोलन -
सरकारने कायदे मागे घ्यावेत, एमएमसपीवर कायदा करावा. अन्यथा हे आंदोलन सुरूच राहील आणि आम्ही देशभर प्रवास करू. आमचे अराजकीय आंदोलन संपूर्ण देशात होईल. मग असे म्हणून नका, की हे कसे आंदोलन आहे, असेही टिकैत म्हणाले.
यांचे देशावर नव्हे व्यापाऱ्यांवर प्रेम -
सरकारवर निशाणा साधताना टिकैत म्हणाले, 'आम्ही तिरंग्याला मानतो. आमची मुलं तिरंग्यासाठी मरतात, ते गावातही यातच येतात. तिरंग्याचा अपमान सहन केला जाणार नाही. यांचे देशावर नाही, व्यापाऱ्यांवर प्रेम आहे. शेतकऱ्यांवर यांचे प्रेम नाही, त्यांच्या अन्न धान्यावर प्रेम आहे. यांचे मातीवर नाही अन्नावर प्रेम आहे. हे खिळे पेरतील आम्ही धान्य पेरू.
टिकैत म्हणाले, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मात्र, एक अट आहे, की प्लॅटफॉर्म बरोबरीचा असेल, तेव्हाच चर्चा होईल. येथे कुणी ट्रॅक्टर घेऊन आला तर नोटीस पाठवली जात आहे. हा कुठला कायदा आहे.
आज आंदोलक शेतकऱ्यांनी 3 तासांच्या चक्काजामची घोषणा केली होती. या अंतर्गत दुपारी 12 ते 3 या वेळेत आंदोलक शेतकऱ्यांनी देशात अनेक ठिकाणी महामार्ग जाम केलेहोते.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही: सुब्रमण्यम स्वामी