Farmer's Protest : आजपासून १०० रुपये प्रतिलीटर दराने दुधाची विक्री? संयुक्त किसान मोर्चाने सांगितले व्हायरल मेसेजमागचे सत्य

By बाळकृष्ण परब | Published: March 1, 2021 10:00 AM2021-03-01T10:00:30+5:302021-03-01T10:09:05+5:30

Farmers Selling milk at Rs 100 per liter from today : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. (Farmers Protest) या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांकडून विविध माध्यमातून केंद्र सरकारची कोंडी करण्यात येत आहेत.

Farmer's Protest: Selling milk at Rs 100 per liter from today? Samyukta Kisan Morcha Says this is Rumors on social media | Farmer's Protest : आजपासून १०० रुपये प्रतिलीटर दराने दुधाची विक्री? संयुक्त किसान मोर्चाने सांगितले व्हायरल मेसेजमागचे सत्य

Farmer's Protest : आजपासून १०० रुपये प्रतिलीटर दराने दुधाची विक्री? संयुक्त किसान मोर्चाने सांगितले व्हायरल मेसेजमागचे सत्य

Next

नवी दिल्ली - केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. (Farmers Protest) या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांकडून विविध माध्यमातून केंद्र सरकारची कोंडी करण्यात येत आहेत. त्यातच आता १ मार्चपासून शेतकऱ्यांकडून १०० रुपये प्रतिलिटर दराने दूध विक्री (milk at Rs 100 per liter) करण्याचा इशार देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आता संयुक्त किसान मोर्चाने दूध दराबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (Selling milk at Rs 100 per liter from today?  Samyukta Kisan Morcha Says this is Rumors on social media)

संयुक्त किसान मोर्चाने रविवारी सांगितले की, त्यांच्याकडून दूध विक्री करण्याचे किंवा १०० रुपये प्रतिलीटर दराने दूध विक्री करण्याबाबत कुठल्याही प्रकारचे आवाहन करण्यात आलेले नाही. आमच्या नावावर सोशल मीडियावर चुकीचे व्हिडीओ आणि मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामध्ये दुधाचे दर वाढवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाच्या नावावर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन किसान मोर्चाकडून करण्यात आले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत होता. त्यामध्ये जर पेट्रोलचे दर १०० रुपये प्रतिलीटर पर्यंत पोहोचू शकतात, तर दुधाचे दर १०० रुपये प्रतिलीटर का होऊ शकत नाहीत, असा सवाल करण्यात आला होता. त्यावरून देशभरात चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चाला पत्रक प्रसिद्ध करून स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हरियाणामधील एका खाप पंचायतीने शेतकऱ्यांना तीन नवे कृषी कायदे आणि इंधनाच्या दरातील वाढीविरोधात १०० रुपये प्रतिलीटर दराने दूध विक्री करण्याचे आवाहन केले होते.  
 

Web Title: Farmer's Protest: Selling milk at Rs 100 per liter from today? Samyukta Kisan Morcha Says this is Rumors on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.