सिंघू सीमेवर पुन्हा धुमश्चक्री! पोलीस अधिकाऱ्यावर तलावारीनं हल्ला, गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 05:22 PM2021-01-29T17:22:19+5:302021-01-29T17:35:03+5:30
अलीपूरच्या एका पोलीस अधिकाऱ्यावर आंदोलनकर्त्यानं तलवारीनं हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीच्या सिंघू सीमेवर पुन्हा एकदा शेतकरी आणि दिल्ली पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली आहे. सिंघू सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधात स्थानिक रहिवाशी निदर्शनं करण्यासाठी आले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.
अलीपूरच्या एका पोलीस अधिकाऱ्यावर आंदोलनकर्त्यानं तलवारीनं हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. हल्ल्यात पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला आहे.
शेतकरी आंदोलनाला वेगळं वळण, राकेश टिकैत यांनी व्यक्त केली केंद्राशी चर्चा करण्याची इच्छा; म्हणाले...
प्रदीप कुमार हे सिंघू सीमेवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ड्यूटीवर होते. यावेळी आंदोलक शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये झटापट झाली. यात शेतकरी आंदोलकांकडून एकानं तलावरीनं वार करण्यास सुरुवात केली, असं प्रदीप कुमार यांनी सांगितलं.
VIDEO: सिंघू सीमेवर पुन्हा आंदोलक शेतकरी-स्थानिकांमध्ये संघर्ष; पोलिसांकडून लाठीमार
२६ जानेवारी रोजी लाल किल्ल्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि सीमेवरुन शेतकऱ्यांनी हटावं यासाठी स्थानिक नागरिक आज सिंघू सीमेवर शेतकऱ्यांच्या विरोधात निदर्शनं करण्यासाठी आले होते. याच वेळी दोन्ही गटांमध्ये दगडफेकीला सुरुवात झाली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत लाठीचार्ज करायला सुरुवात केली. शेतकरी आंदोलकांनी लालकिल्ल्यावर भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केला असून त्यांना आंदोलन करण्याचा कोणताही अधिकार आता राहिलेला नाही, असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. सिंघू सीमेवर रस्ता अडवून बसलेल्या शेतकऱ्यांनी माघारी जावं अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.