Farmers Protests : कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलनातील आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 03:25 PM2020-12-17T15:25:46+5:302020-12-17T15:44:38+5:30
Farmers Protests Punjab Farmer Dies : दिल्ली-हरियाणाच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये पंजाबच्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कायदे रद्दच करा, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा इशारा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. कडाक्याच्या थंडीत गेल्या 22 दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांचा विरोध करत शेतकरी आंदोलन करत आहेत. याच दरम्यान गुरुवारी पहाटे शेतकरी आंदोलनातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-हरियाणाच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये पंजाबच्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. पंजाबच्या या 37 वर्षीय शेतकऱ्याला 10, 12 आणि 14 वर्षांची तीन मुलं आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, नोव्हेंबरमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनादरम्यान आत्तापर्यंत जवळपास 20 आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
"मोदी कोणीची चौकीदारी करतात, अदानी-अंबानींची की शेतकऱ्यांची?"https://t.co/7sX66KVJyN#farmersrprotest#FarmerBill2020#PrashantBhushan#NarendraModi#BJPpic.twitter.com/tHAZe3z0Rt
— Lokmat (@MiLOKMAT) December 16, 2020
गेल्या काही दिवसांत दिल्ली आणि आजूबाजूच्या भागात तापमान कमी आहे. पहाटेच्या सुमारास जवळपास पाच डिग्रीपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दिवसाही तापमान 4 डिग्रीपर्यंत नोंदवण्यात येतं. कडाक्याच्या थंडीतही आपला जीव धोक्यात घालूनही शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सिंघू बॉर्डरवर शकील मोहम्मद कुरेशी कडाक्याच्या थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति असलेला आदर व्यक्त करत आहेत.
कडक सॅल्यूट! सिंघू बॉर्डरवर कडाक्याच्या थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांना 'ही' व्यक्ती वाटते मोफत स्वेटर
शकील मोहम्मद कुरेशी शेतकऱ्यांना मोफत स्वेटर वाटत आहेत. दररोज सकाळी आठ वाजता कुरेशी रस्त्याच्या कडेला आपला स्टॉल लावतात आणि स्थानिक ठिकाणी तयार केलेले स्वेटर नव्या केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली-हरयाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ते मोफत वाटत आहेत. कुरेशी यांनी शेतकऱ्यांना आतापर्यंत 300 जॅकेट्स आणि स्वेटरचं वाटप केलं आहे. कुरेशी हे गरम कपडे विकण्याचे काम करतात. ते दररोज 2500 रुपयांची कमाई करतात.
armers Protest : पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारला विचारला कोंडीत पकडणारा सवालhttps://t.co/is3iaUfJHX#FarmerProtest#FarmerBill2020#PChidambaram#ModiGovernmentpic.twitter.com/1QZMsPhZGV
— Lokmat (@MiLOKMAT) December 14, 2020
कुरेशी यांचे वडील हे उत्तर प्रदेशातील बागपत येथील शेतकरी आहेत. "माझे वडील एक शेतकरी आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य किती कठीण असते हे मला माहीत आहे. शेतकरी आपल्या पिकाला उचित किंमत मिळावी यापेक्षा अधिक काहीच मागत नाहीत" असं कुरेशी यांनी म्हटलं आहे. ते आपली पत्नी आणि मुलांसह उत्तर दिल्लीतील नरेला येथे राहतात. कुरेशी यांनी गरम कपड्यांच्या किंमतीविषयी काही बोलायला नकार दिला. हे चांगल्या कामासाठी माझं योगदान आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Farmers Protest : "सरकारला जे करायचं आहे ते त्यांनी करावं, समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन भाजपाचा खोटारडेपणा उघड करतील"https://t.co/o0wsA7XJq1#FarmersProtest#FarmBills2020#FarmLaws#SamajwadiParty#AkhileshYadavpic.twitter.com/5nuUR5lICm
— Lokmat (@MiLOKMAT) December 13, 2020