लाखो रुपये खर्चून पंजाबचे शेतकरी मागवीत आहेत परराज्यातून मजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 05:35 AM2020-06-08T05:35:35+5:302020-06-08T05:35:53+5:30

उत्तर प्रदेश, बिहारच्या मजुरांसाठी खास बस

Farmers of Punjab are demanding labor from foreign countries by spending lakhs of rupees | लाखो रुपये खर्चून पंजाबचे शेतकरी मागवीत आहेत परराज्यातून मजूर

लाखो रुपये खर्चून पंजाबचे शेतकरी मागवीत आहेत परराज्यातून मजूर

Next

बर्नाला : पंजाबमध्ये भात पिकाच्या लागवडीचे काम सुरू असताना हे शेतकरी लाखो रुपये खर्चून उत्तर प्रदेश आणि बिहारमधून मजूर मागवीत आहेत. बिहारमधील एखाद्या जिल्ह्यातून ३५ ते ४० स्थलांतरित कामगार बसने आणण्यासाठी १ लाख ते १.२० लाख रुपये खर्च येत आहे, तर उत्तर प्रदेशातील जवळच्या जिल्ह्यातून या मजुरांना आणण्यासाठी ६५ ते ७५ हजार रुपये खर्च येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मजुरांची चाचणी करण्यात येत आहे, तसेच अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना काम करण्यास परवानगी दिली जात आहे. शेतातच या मजुरांना वेगळे ठेवण्यात येत आहे. बर्नाल जिल्ह्याचे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष जगसीर सिंग म्हणाले यांनी सांगितले की, बासमतीसह अन्य जातींचे भात पीक २७ लाख हेक्टरमध्ये लावण्यात येणार आहे. आम्ही उत्तर प्रदेश आणि बिहारमधून ६५ कामगारांना दोन बसमधून आणले आहे. पूर्णियाचे शेतकरी गुरप्रीत सिंग यांनी सांगितले की, सहा शेतकऱ्यांनी कामगारांना आणण्यासाठी तीन बसेस पाठविल्या आहेत. लवकरच ते राज्यात दाखल होतील.

Web Title: Farmers of Punjab are demanding labor from foreign countries by spending lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.