लाल किल्ल्यावर हिंसक आंदोलन, २ तास बाथरूममध्ये लपून वाचवला जीव; ASI नं सांगितला भयानक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 12:19 PM2021-01-28T12:19:33+5:302021-01-28T12:23:51+5:30

पोलिसानं कथन केला भयानक अनुभव

farmers rally violence delhi police asi ramesh saved life by staying in bathroom for two hours | लाल किल्ल्यावर हिंसक आंदोलन, २ तास बाथरूममध्ये लपून वाचवला जीव; ASI नं सांगितला भयानक अनुभव

लाल किल्ल्यावर हिंसक आंदोलन, २ तास बाथरूममध्ये लपून वाचवला जीव; ASI नं सांगितला भयानक अनुभव

Next
ठळक मुद्देअतिरिक्त कुमक आल्यानंतर वाचला जीवशेतकरी आंदोलनातील काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर केलं होतं हिंसक आंदोलन

प्रजासत्ताक दिनीदिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. त्यानंतर काही आंदोलकांनी लाल किल्ल्यातही प्रवेश करत मोडतोड केली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या आंदोलनानं देशाची मान शरमेनं खाली घातल्याचंही म्हटलं जात आहे. लाल किल्लात शिरलेल्या जमावानं केलेल्या तोडफोडीचं चित्रही आता समोर आलं आहे. याचदरम्यान, आपलं कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानं २ तास बाथरूममध्ये लपून या जमावापासून कसा जीव वाचवला याचा भयानक अनुभव कथन केला आहे. 

दिल्लीतील पोलीस ठाण्यातील एएसआय रमेश मंगळवारी लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यावर तैनात होते. शेतकऱ्यांचं आदोलन कशाप्रकारे लाल किल्ल्याच्या दिशेनं वळत आहे याची माहिती त्यांना देणअयात आली होती. ते अन्य सुरक्षा रक्षकांप्रमाणेच सुरक्षेचं काम पाहत होते. त्याच वेळी काही आंदोलकांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला. एएसआय रमेशदेखील आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांना थांबवण्यासाठी पुढे सरसावले. परंतु आंदोलक त्यांच्याच दिशेने पुढे आले. जीव वाचवण्यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह लाल किल्ला परिसरात असलेल्या एका शौचालयात शिरले. जवळपास दोन तास आंदोलकांनी ते शौचालयातून बाहेर पडण्याची वाट पाहिली. यादरम्यान त्यांनी गेटही तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ते तोडता आलं नाही. ज्यावेळी पोलिसांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला त्यावेळी त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर येता आलं, असा भीतीदायक अनुभव त्यांनी सांगितला. 

छावणीचं स्वरूप

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी रात्री एका उच्चस्तरीय बैठकीत दिल्लीतील परिस्थितीचा आढावा घेतला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासह शांतता प्रस्थापित करण्यासाठी निमलष्कर दलाची अतिरिक्त कुमक तैनात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव उपस्थित होते. दिल्लीतील संवेदनशील स्थळांवर निमलष्कर दलाचे जवान तैनात केले जातील, असे गृहमंत्रालयाने एका निवेदनात स्पष्ट केले. त्यानंतर, लागलीच निमलष्करी दलाच्या सुमारे १५ ते २० कंपन्या म्हणजे १५०० ते २००० जवान दिल्लीत दाखल झाले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या बंदोबस्तासाठी राजधानीत यापूर्वीच निमलष्कराचे ४५०० जवान तैनात आहेत. आता, लाल किल्ला परिसराला छावणीचं रुप प्राप्त झालं असून निमलष्करी दलाचे सैनिक शस्त्र घेऊन तैनात आहेत.
 

Web Title: farmers rally violence delhi police asi ramesh saved life by staying in bathroom for two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.