शेतकर्‍यांनी दुष्काळी परिस्थितीला घाबरू नये सत्कार : बसवराज पाटील यांचे आवाहन

By Admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:22+5:302014-12-20T22:27:22+5:30

किल्लारी : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीला शेतकर्‍यांनी घाबरू नये़ मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत़ या भागातील ऊस उत्पादकांचा ऊस पूर्णपणे गाळप होईल, असे प्रतिपादन आमदार बसवराज पाटील यांनी शुक्रवारी येथे केले़

Farmers should not be afraid of drought situation: Felicitation of Basavaraj Patil | शेतकर्‍यांनी दुष्काळी परिस्थितीला घाबरू नये सत्कार : बसवराज पाटील यांचे आवाहन

शेतकर्‍यांनी दुष्काळी परिस्थितीला घाबरू नये सत्कार : बसवराज पाटील यांचे आवाहन

googlenewsNext
ल्लारी : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीला शेतकर्‍यांनी घाबरू नये़ मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत़ या भागातील ऊस उत्पादकांचा ऊस पूर्णपणे गाळप होईल, असे प्रतिपादन आमदार बसवराज पाटील यांनी शुक्रवारी येथे केले़
किल्लारी येथे आमदार बसवराज पाटील यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला़ याप्रसंगी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी स्वातंत्र्यसैनिक माधव मोरे होते़ यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, शैैलेश पाटील चाकूरकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, बापूराव पाटील, सभापती सुलोचना बिदादा, मुजिबोद्दिन पटेल, नारायणआबा लोखंडे, माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे, गुंडाप्पा बिरादार, विजयकुमार सोनवणे, नानाराव भोसले, अफसर शेख, बसवराज धाराशिवे, अरूण मुकडे, किरण बाभळसुरे, सरपंच रेखा क्षीरसागर, विश्वनाथ क्षीरसागर, माधव पाटील, राजू जळकोटे, प्रकाश मिरगे, अजय धन्ना, सुरज बाभळसुरे, देवानंद बिरादार, सचिन पाटील, प्रा़डॉ़काशिनाथ राजे, वलीखाँ पठाण, वसंत मंजुळे, डॉ़ राजेश गुंजिटे, जयपाल भोसले, विठ्ठलराव बाभळसुरे, निवृत्ती भोसले यांची उपस्थिती होती़
पुढे आमदार पाटील म्हणाले, सध्या मी विरोधी पक्षाचा आमदार असलो तरी विकासकामांसाठी सत्तेची आवश्यकता नाही़ विकासकामांच्या निधीसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्यास आपण तयार आहोत़ शेतकर्‍यांनी दुष्काळी परिस्थितीला घाबरून आत्महत्या करू नये़ आत्महत्या केल्याने समस्या सुटत नाहीत, असेही ते म्हणाले़ प्रास्ताविक किरण बाभळसुरे यांनी केले़ सूत्रसंचालन राजेंद्र जळकोटे यांनी केले़ कार्यक्रमास बालाजी चव्हाण, दिलीप लोहार, महादेव पाटील, राजेंद्र पोतदार, अंकुश टाचले, गुलाब शिंदे, नरसिंग ठाकूर आदी उपस्थित होते़

Web Title: Farmers should not be afraid of drought situation: Felicitation of Basavaraj Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.