पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा बंद, डल्लेवालांची प्रकृती नाजूक; बाजारपेठा कडेकोट बंद, वाहतुकीवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 06:47 IST2024-12-31T06:46:01+5:302024-12-31T06:47:57+5:30
...दरम्यान, उपोषणकर्ते शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांच्या उपोषणाच्या ३५व्या दिवशी प्रकृती खालावली आहे.

पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा बंद, डल्लेवालांची प्रकृती नाजूक; बाजारपेठा कडेकोट बंद, वाहतुकीवर परिणाम
चंडीगड : पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी किमान हमी भावासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदमुळे राज्यात जनजीवन विस्कळीत झाले. यादरम्यान, बहुतांश प्रमुख मार्गांवर वाहतुकीवर परिणाम झाला, तर बाजारपेठा कडेकोट बंद होत्या. सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत या बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदच्या काळात शेतकऱ्यांनी जालंधर, पतियाळा, अमृतसर, फिरोजपूर अशा विविध शहरांमध्ये रस्त्यांवर धरणे धरून आंदोलन केले. दरम्यान, उपोषणकर्ते शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांच्या उपोषणाच्या ३५व्या दिवशी प्रकृती खालावली आहे.
शेतकऱ्यांनी रेल्वे मार्ग अडवले
- शेतकऱ्यांनी अनेक रेल्वेमार्गावरच ठिय्या धरल्याने सकाळपासून चार वाजेपर्यंत अनेक रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या.
- फिरोजपूर, जालंधरसह इतर शहरांत रेल्वे स्टेशनवर हजारो प्रवासी अडकून पडले.
- निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्थानिक लोकांनी खाद्यपदार्थांची व्यवस्था केली.