राजस्थानमध्ये शेतकरी आंदोलन चिघळलं, हजारो शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसह 150 जवानांना ठेवलं ओलिस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 04:09 PM2021-10-03T16:09:20+5:302021-10-03T16:10:49+5:30

राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये कालव्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सूरू आहे.

Farmers Surrounded The SDM Office And Held One Hundred And Fifty Soldiers Including DySP And Other Officers Hostage in gharsana in rajsthan | राजस्थानमध्ये शेतकरी आंदोलन चिघळलं, हजारो शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसह 150 जवानांना ठेवलं ओलिस

राजस्थानमध्ये शेतकरी आंदोलन चिघळलं, हजारो शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसह 150 जवानांना ठेवलं ओलिस

Next

श्रीगंगानगर: श्रीगंगानगरच्या घाडसानामध्ये कालव्याच्या पाण्यासाठी धुमसत असलेल्या ठिणगीने रौद्र रुप धारण केलं. शनिवारी रात्री उशिरा हजारो शेतकऱ्यांनी DSPसह सुमारे 150 पोलीस कर्मचाऱ्यांना बंधक बनवलं. त्यांना सकाळीही बाहेर पडू दिलं जात नव्हतं. तणावाच्या पार्श्वभूमीवर घाडसानामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्ली-हरियाणा सीमेवरील शेतकरी चळवळीच्या उलट, या आंदोलनात राजस्थानचे गेहलोत सरकार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या घाडसानमधील हे आंदोलक शेतकरी सिंचनासाठी पाण्याची मागणी करत आहेत. काही दिवसात त्यांना पाणी न दिल्यास त्यांचे हजारो एकर पीक उद्ध्वस्त होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. राज्य सरकारचा एकही प्रतिनिधी चर्चेसाठी न पोहचल्याने दीर्घकाळ सुरू असलेले शेतकरी आंदोलन वाढण्याची शक्यता आहे. सध्या 10 हजारांहून अधिक शेतकरी येथे जमले असून, ही संख्या सतत वाढत आहे. मोठ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी याच ठिकाणी जेवणाचीही व्यवस्था केली आहे.

शेतकऱ्यांचा गेहलोत सरकारला इशारा

राजस्थानमध्ये पाण्याच्या अभावी पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारला पाणी न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. सध्या आंदोलक शेतकऱ्यांनी एसडीएम कार्यालयाला घेराव घातला असून, पाण्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत कोणीही आत किंवा बाहेर जाऊ शकणार नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. ओलिस झालेल्यांमध्ये डीएसपी जयदेव सिहाग आणि आणखी एक उच्च पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. 
 

Web Title: Farmers Surrounded The SDM Office And Held One Hundred And Fifty Soldiers Including DySP And Other Officers Hostage in gharsana in rajsthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.