शेतकरी करणार भाजपविरोधी प्रचार, टीकैत यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 09:16 AM2021-09-06T09:16:59+5:302021-09-06T09:17:42+5:30

राकेश टिकैत यांचा उत्तर प्रदेशातील मेळाव्यात इशारा

Farmers will campaign against BJP, Rakesh tikait warning | शेतकरी करणार भाजपविरोधी प्रचार, टीकैत यांचा इशारा

शेतकरी करणार भाजपविरोधी प्रचार, टीकैत यांचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देया मेळाव्याला हापूर, अलिगढ व इतर भागातले शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातील उत्तर प्रदेशमधील हा सर्वात मोठा मेळावा होता

मुझफ्फरनगर : पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांत भाजपविरोधात जोरदार प्रचार करण्याचे आंदोलक शेतकऱ्यांनी ठरविले आहे, असे भारतीय किसान युनियनचे नेते व प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितले. मुझफ्फरनगर येथे रविवारी झालेल्या शेतकऱ्यांच्या विशाल मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला. येत्या २७ सप्टेंबरला देशव्यापी बंद पाळण्याचाही शेतकऱ्यांचा विचार आहे असेही टिकैत म्हणाले.

या मेळाव्याला हापूर, अलिगढ व इतर भागातले शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातील उत्तर प्रदेशमधील हा सर्वात मोठा मेळावा होता, नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन  यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मुझफ्फरनगर येथील मेळाव्याला अन्य शेतकरी नेतेही उपस्थित होते.  २८ ऑगस्ट रोजी हरयाणा पोलिसांनी कर्नाल येथे शेतकऱ्यांवर लाठीमार केला, त्यात १० शेतकरी जखमी झाले होते. त्यात एकाचा मृत्यूही झाला होता; पण ती व्यक्ती हृदयविकाराने मरण पावली, असा दावा पोलिसांनी केला होता. या लाठीमारीच्या निषेधासाठी देखील मुझफ्फरनगर येथे रविवारी विशाल मेळावा आयोजिण्यात आला होता. 

केंद्राच्या दुर्लक्षामुळेच शेतमालाच्या किमतीत घसरण : शरद पवार
जुन्नर (जि. पुणे) : केंद्र सरकार कृषी क्षेत्राकडे लक्ष देत नसल्याने 
शेतमालाच्या किमती घसरतात. दलाल शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करतात. यासाठी कठोर पावले उचलावी लागतील, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले.
जुन्नर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बसविण्यात आलेल्या सहकारमहर्षी शिवाजीराव महादेवराव तथा दादासाहेब काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घ्या : वरुण गांधी
nनव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचे दु:ख, वेदना सरकारने जाणून घेतली पाहिजे. त्यांना चर्चेसाठी पाचारण केले पाहिजे. 
nत्यातूनच शेतकऱ्यांबाबतची वस्तुस्थिती समजू शकेल, असे भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी म्हटले आहे व आपल्या पक्षाला घरचा अहेर दिला आहे. 
nत्यांनी मुझफ्फरनगर येथे झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांच्या विशाल मेळाव्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. वरुण गांधी यांनी अनेकवेळा या आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहेत.

Web Title: Farmers will campaign against BJP, Rakesh tikait warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.