PM Kisan Samman Nidhi Refund List: 'या' शेतकऱ्यांना पीएम किसानचे सर्व हप्ते परत करावे लागणार; यादीत तुमचे नाव तपासा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 02:14 PM2021-11-17T14:14:12+5:302021-11-17T14:15:52+5:30
PM Kisan Samman Nidhi Refund List: केंद्र सरकारने अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत तुमचं नाव नाही का, हेही तपासावे लागणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi) देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६००० रुपये पाठविले जातात. परंतू, फसवणूक आणि गोंधळामुळे आता सरकार अपात्र लोकांकडून पैसे वसूल करणार आहे. सोबतच शासनाने अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत तुमचं नाव नाही का, हेही तपासावे लागणार आहे.
केंद्र सरकारने आजवर 9 हप्ते दिले आहेत. दहावा हप्ता हा 16 डिसेंबरला येणार आहे. या योजनेतील अपात्र शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारचे पैसे परत करावे लागणार आहेत. जे शेतकरी सरकारी नोकरी किंवा कोणताही व्यवसाय करत आहेत आणि या योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना पैसे परत करावे लागतील. अपात्र शेतकरी या शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अशी अनेक प्रकरणे उघड झाली आहेत.
केंद्र सरकारने अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत तुमचे नाव आहे की नाही असे चेक करा...
- तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला अपात्र श्रेणी, शेतकऱ्याचे नाव, नोंदणी क्रमांक, लिंग, राज्य, ब्लॉक, जिल्हा, हप्ता रक्कम, परतावा मोड आणि खाते क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
- त्यानंतर स्क्रीनवर अपात्र शेतकऱ्यांची यादी दिसेल. तुम्ही या यादीत तुमचे नाव तपासू शकता.
- जर तुमचे नाव असेल तर तुम्ही आजवर घेतलेले सर्व पैसे परत करावे लागणार आहेत.
संबंधीत बातम्या...