शेतक-यांना माल फेकावा लागणार नाही, वाणिज्यमंत्री सुरेश प्रभूंना आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 03:08 AM2018-01-19T03:08:04+5:302018-01-19T03:09:26+5:30
महाराष्ट्रासह देशातील कोणत्याही शेतकºयाला त्याचे उत्पादन यापुढे रस्त्यावर फेकायची वेळ येणार नाही, अशी आशा केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांना आहे.
संतोष ठाकूर
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील कोणत्याही शेतकºयाला त्याचे उत्पादन यापुढे रस्त्यावर फेकायची वेळ येणार नाही, अशी आशा केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांना आहे. सरकार शेतकºयांना त्यांच्या उत्पादनाला आलेला खर्च द्यायला आणि त्यांना त्यांचे उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचवण्यासाठीच्या कृषी निर्यात धोरणावर काम करीत आहे. या विषयाशी संबंधित सगळे घटक आणि जनतेशी लवकरच चर्चा केली जाईल, असे प्रभू म्हणाले.
गे्रटर नोएडामध्ये एक्स्पोर्ट मार्टमध्ये सुरू झालेल्या दोन दिवसांच्या इंडस फूड नावाच्या शिखर परिषदेच्या उद््घाटनादरम्यान प्रभू ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, या परिषदेत ४३ देशांचे ४०८ प्रतिनिधी सहभागी आहेत. ट्रेड प्रमोशन कौन्सिल आॅफ इंडिया -वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित या परिषदेत भारतीय खरेदीदारांशी आंतरराष्ट्रीय रिटेल चेन आणि प्रतिनिधी उत्पादन खरेदीसाठी थेट बोलू शकतील. प्रभू यांना वाटते की, इंडस फूड आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेची परिषद व्हावी. ही पहिलीच वेळ आहे की, जेथे शेतकरी, उत्पादक आणि भारतीय व्यापारी विदेशात न जाता आंतरराष्ट्रीय रिटेल चेन आणि इतर कंपन्यांशी थेट व्यवहार-चर्चा करू शकतात. हे कौतुकास्पद पाऊल आहे. नव्या कृषी निर्यात धोरणाचा विचार केला, तर वस्तुस्थिती बदलेल. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट होईल असे नाही, तर आपल्या उत्पादनाला जो जास्त भाव देईल त्याला ते विकण्याचा पर्याय त्याच्यासमोर उपलब्ध असेल.
याचबरोबर विदेशांत खाद्यान्नाचे वेगवेगळे प्रकार निर्यात करण्यासाठीही पावले उचलली जात आहेत.
त्यात नागपूर विमानतळावरून जिवंत मेंढ्या-शेळ्या सौदी अरेबियात पाठवण्यासोबत नागपूरची संत्री आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या माध्यमातून स्वस्त दरांनी जगात पोहोचवणेही समाविष्ट आहे. असाच प्रयोग पूर्वोत्तर भारतासाठीही केला जात आहे. दक्षिण भारतातील सागरी भोजन व उत्तर भारतातून गहू व तांदळाची निर्यात वाढवण्याचाही प्रयत्न केला जात आहे, असेही प्रभू म्हणाले.