शेतीचे रचनाशास्त्र---१
By Admin | Published: January 14, 2017 12:06 AM2017-01-14T00:06:28+5:302017-01-14T00:06:28+5:30
आपण किती व कोणते पशु पाळणार आहोत? भविष्यात त्यांची किती गरज राहील? ते मुख्य घरापासून त्यांच्या आणि आपल्या आरोग्य, देखभाल, संरक्षणाच्या बाबतीत किती अंतरावर व कोणत्या रचनेत असावेत या सर्व बारीकसारीक गोष्टींचा विचार करून घर बांधायचा निर्णय घ्यावा. तसेच आपणाकडे सध्या कोणकोणती अवजारे व मोटारसायकल, जीप सारखी साधने आहेत? भविष्यात कोणती येण्याची शक्यता आहे? त्यांची ठेवण्याची सध्याची जागा संरक्षण व भविष्यातली गरज यासुद्धा गोष्टींचा विचार करून घर कोठे? किती मोठे? कोणत्या पदार्थांचा वापर करून बांधावे हा विचार व्हावा.
आ ण किती व कोणते पशु पाळणार आहोत? भविष्यात त्यांची किती गरज राहील? ते मुख्य घरापासून त्यांच्या आणि आपल्या आरोग्य, देखभाल, संरक्षणाच्या बाबतीत किती अंतरावर व कोणत्या रचनेत असावेत या सर्व बारीकसारीक गोष्टींचा विचार करून घर बांधायचा निर्णय घ्यावा. तसेच आपणाकडे सध्या कोणकोणती अवजारे व मोटारसायकल, जीप सारखी साधने आहेत? भविष्यात कोणती येण्याची शक्यता आहे? त्यांची ठेवण्याची सध्याची जागा संरक्षण व भविष्यातली गरज यासुद्धा गोष्टींचा विचार करून घर कोठे? किती मोठे? कोणत्या पदार्थांचा वापर करून बांधावे हा विचार व्हावा.काही वेळा तीन चार भाऊ असतील तर एकत्र असताना व फारशी ऐपत नसताना सरळसोट लांबलचक चाळ बांधून त्यात प्रत्येक भावासाठी दोन-दोन खोल्या येतील अशी रचना केली जाते. पुढे ते वेगळे निघाले म्हणजे शेजारी शेजारी राहताना भाऊ, भाऊ जावाजावात किंवा एकमेकांच्या मुलांमध्ये भांडणे होऊन एकमेकांचे तोंड सुद्धा पाहू नये अशी स्थिती येते व घरातून आनंद, सोयी मिळण्याऐवजी द्वेष, तिरस्कार, भांडणे अशा गोष्टींना तोंड द्यावे लागते. शिवाय त्या घरांमध्ये बांधतानाच सर्वांसाठी वेगळी बाथरूम, स्वयंपाक घर, हवेशीरपणा, धान्य, औजारे ठेवण्याच्या जागा, जनावरे बांधण्याच्या सोयी यांचा आगावू विचार न झाल्याने ऐपत नसल्याने धड ते सोडून दुसरीकडे जाताही येत नाही व सतत हेवेदारे, दु:स्वास, भांडणे, कटकटी सोसत दिवस काढावे लागत असल्याने भावी पिढीसुद्धा निकोप वातावरणात न वाढल्याने त्यांच्या अंगच्या गुणांचा विकास होण्याऐवजी विकृती निर्माण होतात.अलिकडे बहुदा वेगळ्या कुटुंबपद्धतीची प्रथा असल्याने सामान्य ऐपत असणार्या माणसाचे घर बांधताना ते कसे असावे ते खालील गोष्टींवरून लक्षात येईल.(अपूर्ण...)