Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त वक्तव्य; तिरंग्याचा अपमान केल्याने वाद...
By ओमकार संकपाळ | Published: July 6, 2022 07:16 PM2022-07-06T19:16:18+5:302022-07-06T19:17:24+5:30
Farooq Abdullah Controversial Statement: श्रीनगरमध्ये पत्रकारांनी अब्दुल्लांना 'हर घर तिरंगा' मोहिमेबद्दल विचारल्यावर त्यांनी हे विधान केले.
Farooq Abdullah Statement: आपल्या विधानांमुळे अनेकदा वाद निर्माण करणारे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी कोणत्याही नेत्यावर किंवा पाकिस्तानवर भाष्य केले नसून भारताचा राष्ट्रीय ध्वज आणि तिरंग्याचा अपमान केला आहे.
Srinagar, J&K | Keep it (the Tiranga) in your house: J&K National Conference chief Farooq Abdullah, when asked about 'Har Ghar Tiranga' campaign pic.twitter.com/1N7xdenJgD
— ANI (@ANI) July 6, 2022
अब्दुल्ला यांच्या वक्तव्याने खळबळ
श्रीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ईद आणि यशवंत सिन्हा यांच्या मुद्द्यावर बोलताना एका पत्रकाराने प्रत्येक घरात तिरंगा असा प्रश्न विचारला. त्यावर अब्दुल्ला यांनी काश्मिरी भाषेत उत्तर दिले. ते काश्मिरी भाषेत म्हणाला, 'तुझ्या घरात ठेव'. त्यांच्या या विधानानंतर वाद निर्माण झाला. या प्रश्नाचे त्यांना साधे उत्तर देता आले असते, पण त्यांनी मुद्दाम असे विधान केले, असे लोक म्हणत आहेत.
काय आहे 'हर घर तिरंगा' मोहीम?
काही दिवसांपूर्वी काश्मीर ग्रामीण विकास विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश जारी करून प्रत्येक घराघरात तिरंगा मोहीम यशस्वी करण्यास सांगितले होते. केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून 15 ऑगस्ट रोजी 'हर घर तिरंगा' मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत लोकांना घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.