फारुख अब्दुल्ला, ऋषी कपूर देशद्रोही; वाराणसीत चिटकवले पोस्टर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 06:22 PM2017-11-17T18:22:02+5:302017-11-17T18:39:23+5:30

गेल्या काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान करणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि अभिनेते ऋषी कपूर यांचे पोस्टर शहरात ठिकठिकाणी लावले असून त्यावर देशद्रोही असल्याचे लिहिले आहे. 

Farooq Abdullah, Rishi Kapoor, anti-national, poster posted in Varanasi | फारुख अब्दुल्ला, ऋषी कपूर देशद्रोही; वाराणसीत चिटकवले पोस्टर 

फारुख अब्दुल्ला, ऋषी कपूर देशद्रोही; वाराणसीत चिटकवले पोस्टर 

Next
ठळक मुद्देफारुख अब्दुल्ला, ऋषी कपूर देशद्रोहीवाराणसीत चिटकवले पोस्टर त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा आरोप

वाराणसी :  गेल्या काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान करणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि अभिनेते ऋषी कपूर यांचे पोस्टर शहरात ठिकठिकाणी लावले असून त्यावर देशद्रोही असल्याचे लिहिले आहे. 
येथील मानवाधिकार जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही पोस्टर लावली असल्याचे समजते. दरम्यान, काल फारुख अब्दुल्ला आणि अभिनेते ऋषी कपूर त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा आरोप करत मानवाधिकार जनशक्ती पार्टीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.


फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीरप्रश्नावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या उरी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. पाक व्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग आहे. जम्मू-काश्मीर ज्याप्रमाणे भारताचा भाग आहे तसेच पीओकेवर पाकिस्तानचा अधिकार आहे, असे फारुख अब्दुल्ला म्हणाले होते. काश्मीरचा मुद्दा सोडवायचा असल्यास आपल्याला पाकिस्तान बरोबर चर्चा करावी लागेल. केंद्र सरकारला काश्मीरमध्ये शांतता हवी असेल तर त्यांना पाकिस्तान बरोबर चर्चा करावीच लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला होता.  




दरम्यान, फारुख अब्दुला यांच्या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मात्र, अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले होते. त्यामुळे मानवाधिकार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते चंद्रशेखर सिंह यांनी गुरुवारी दोघांविरोधात देशद्रोहाचा आरोप करत स्थानिक कोर्टात तक्रार दाखल केली आहे.  देशाची एकता आणि अखंडतेविरोधात वक्तव्य करणाऱ्यांना शिक्षा करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी कोर्टाकडे केली. कोर्टानेही  त्यांची याचिका दाखल करून घेतली असून त्यावर 21 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.



 

Web Title: Farooq Abdullah, Rishi Kapoor, anti-national, poster posted in Varanasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.