Taliban: तालिबान इस्लामिक तत्त्वांचे पालन करून सुशासन देतील; फारुक अब्दुल्लांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 02:23 PM2021-09-08T14:23:57+5:302021-09-08T14:30:06+5:30
Taliban: अफगाणिस्तानमध्ये तालिबान चांगले शासन चालवतील, असा विश्वास फारूक अब्दुल्ला यांनी व्यक्त केला आहे.
श्रीनगर: अखेर अफगाणिस्तानमध्येतालिबानने सरकार स्थापन केले आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंद अफगाणिस्तानमधीलतालिबान सरकारचे पंतप्रधान असतील. सिराज हक्कानीला गृहमंत्री, तर मुल्ला याकूबला संरक्षण मंत्री बनवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल काँग्रेसचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी तालिबान सरकारबाबत एक विधान केले आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान चांगले शासन चालवतील, असा विश्वास फारूक अब्दुल्ला यांनी व्यक्त केला आहे. (farooq abdullah statement over taliban form government in afghanistan)
“सर्वांचे पूर्वज एकच आहेत, तर मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक का”; मायावतींचा RSS ला सवाल
अमेरिकेने सैन्य मागे घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांत तालिबानने अफगाणिस्तावर ताबा मिळवला आणि सरकार स्थापन केले. अब्दुल गनी बरादर उपपंतप्रधान असतील. खैरउल्लाह खैरख्वा हे माहिती प्रसारण मंत्री असतील. अब्दुल हकीम याच्याकडे कायदे मंत्रालय असेल. शेर अब्बास स्टानिकजई परराष्ट्र राज्य मंत्री असतील. तर जबिउल्लाह मुजाहिदला माहिती प्रसारण मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. तालिबानच्या सरकार स्थापनेवर जम्मू काश्मीरमधील एका कार्यक्रमानंतर फारूक अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“…तर तालिबानने जावेद अख्तर यांना चौकात फटके मारले असते”; भाजपचे टीकास्त्र
इस्लामिक नियमांनुसार शासन केले पाहिजे
मला आशा आहे की तालिबान अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक तत्त्वांचे पालन करून सुशासन देतील आणि मानवाधिकारांचा आदर करतील. तसेच त्यांनी जागतिक स्तरावरील सर्व देशांशी चांगले संबंध प्रस्थापित केले पाहिजेत. तालिबानने सर्वांसोबत न्यायाने वागेल आणि उत्तम शासन चालवेल, असा विश्वास फारूक अब्दुल्ला यांनी व्यक्त केला आहे.
#WATCH | "I hope they (Taliban) will deliver good governance following Islamic principles in that country (Afghanistan) & respect human rights. They should try to develop friendly relations with every country," says National Conference chief Farooq Abdullah in Srinagar pic.twitter.com/b6hXNn2Bhr
— ANI (@ANI) September 8, 2021
“तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही? मोदी सरकारने स्पष्ट करावे”: ओमर अब्दुल्ला
भाजपचा पलटवार
तालिबान अफगाणिस्तानातील महिला आणि अल्पसंख्यकांवर अत्याचार करत आहेत. ते फारूक अब्दुल्ला यांना दिसत नाही का, असा सवाल करत ज्या देशात मुस्लिम समुदाय अल्पसंख्यक आहे, त्याच देशात फारूक अब्दुल्ला यांना सेक्युलिरिझम हवे आहे आणि ज्या देशात मुस्लिम समुदाय बहुसंख्य आहे, तेथे त्यांना इस्लामाच्या नियमांनुसार देश चालायला हवा आहे. अत्याचार सुरू असल्याचे दिसूनही फारूक अब्दुल्ला तालिबानची बाजू घेत आहेत, या शब्दांत जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते निर्मल सिंह यांनी हल्लाबोल केला आहे.
“शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय, विरोधी पक्ष वापर करून घेतोय”; भाजपची टीका
दरम्यान, तालिबान सरकारमध्ये त्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे, जे २० वर्षापासून अमेरिका पुरस्कृत अफगाणिस्तानविरोधात मोर्चा उघडला होता. गैर तालिबानींना अफगाणिस्तानच्या नव्या सरकारमध्ये सामावून घ्या, अशी मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली. परंतु ती मागणी पूर्ण झाली नाही.