‘वायकोंच्या याचिकेमुळे फारुक अब्दुल्लांवर कारवाई?’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 03:49 AM2019-09-18T03:49:33+5:302019-09-18T03:49:37+5:30
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री यांना सार्वजनिक सुरक्षा कायदा लावण्यामागचे नेमके कारण काय असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व ख्यातनाम विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी केला आहे.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री यांना सार्वजनिक सुरक्षा कायदा लावण्यामागचे नेमके कारण काय असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व ख्यातनाम विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी केला आहे.
फारुक अब्दुल्ला यांना न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश केंद्राला द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका एमडीएमकेचे प्रमुख वायको यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यामुळे केंद्राने ही कारवाई केली का अशी विचारणाही सिब्बल यांनी केली आहे. अब्दुल्लांना निवासस्थानी स्थानबद्ध केले आहे. सोमवारी त्यांच्यावर पीएसए कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याने ते आता दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ अटकेत राहाण्याची शक्यता आहे.