रशीद मियां मकबरा की शिव मंदिर? कोर्टाचे आदेश अन् झाला सर्व्हे, हिंदू पक्षाचा मोठा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 02:48 PM2024-02-08T14:48:14+5:302024-02-08T14:51:37+5:30

Farrukhabad News: मंदिरात ज्या ठिकाणी शिवलिंग होते, ते हटवून मकबरा बांधण्यात आला. या ठिकाणी सर्व प्रकारची हिंदू प्रतिके आढळतात, असे म्हटले जात आहे.

farrukhabad tomb rashid mian makbara or gangeshwar nath shiv mandir survey conducted after th court orders | रशीद मियां मकबरा की शिव मंदिर? कोर्टाचे आदेश अन् झाला सर्व्हे, हिंदू पक्षाचा मोठा दावा!

रशीद मियां मकबरा की शिव मंदिर? कोर्टाचे आदेश अन् झाला सर्व्हे, हिंदू पक्षाचा मोठा दावा!

Farrukhabad News: ज्ञानवापी येथील व्यास तळघरात हिंदूंना पूजेची परवानगी देण्याचे निर्देश अलीकडेच देण्यात आले. यानंतर आता उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथे असलेला रशीद मियां मकबरा हे एक शिव मंदिर होते का, असा दावा करण्यात आला आहे. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीनंतर त्या जागेचा सर्व्हे करण्यात आला. याचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. 

फर्रुखाबादमध्ये ज्ञानवापीसारखे प्रकरण समोर आले आहे. कायमगंज तहसीलच्या रशिदाबाद येथे असलेल्या रशीद मिया यांचा शेकडो वर्षे जुना मकबरा शिव मंदिर असल्याचा दावा करत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. हा मकबरा आताच्या घडीला पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. न्यायालयाच्या आदेशावरून या ठिकाणचे सर्वेक्षण करण्यात आले. कायमगंज शहरातील रहिवासी आणि हिंदू जागरण मंचचे कार्यकर्ते प्रदीप सक्सेना यांनी जिल्हा दंडाधिकारी आणि पुरातत्व विभागाला नोटीस देऊन रशिदाबाद गावात असलेला मकबरा शिव मंदिर असल्याचा दावा केला. तसेच मकबरा येथे सर्वेक्षण करण्याची मागणी केली. हे शिव मंदिर होते, मुघल आक्रमकांनी उद्ध्वस्त करून मकबरा बांधला, असा दावा सक्सेना यांनी केला आहे.

प्रदीप सक्सेना यांचा दावा आहे की, मऊ नामक भागातील रशिदाबाद येथे असलेल्या या मकबरापूर्वी प्राचीन काळातील गंगेश्वरनाथ शिव मंदिर होते. सन १६०७ मध्ये मुघलांनी ते पाडले होते. या ठिकाणी नवाब रशीद खान (रशीद मियाँ) यांचा मकबरा बांधण्यात आला. रशीद मिया मकबरा म्हटले जाते. जुन्या शिव मंदिराची मूळ रचना बदलली नाही. याउलट मंदिरात ज्या ठिकाणी शिवलिंग होते, ते बाजूला करून त्याच ठिकाणी मकबरा बनवण्यात आला. प्रदीप सक्सेना यांनी याबाबत एक याचिका न्यायालयात दाखल केली. 

दरम्यान, रशीद मियां मकबरा येथे सर्व प्रकारची हिंदू प्रतिके आढळून येतात. ती पाहायला मिळू शकतात, असा दावाही करण्यात आला आहे. 
 

Web Title: farrukhabad tomb rashid mian makbara or gangeshwar nath shiv mandir survey conducted after th court orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.