सेन्सेक्सच्या तेजीचे पाचवे सत्र
By Admin | Published: July 21, 2014 11:48 PM2014-07-21T23:48:44+5:302014-07-21T23:48:44+5:30
मुंबई शेअर बाजारात तेजीचा सपाटा सलग पाचव्या दिवशीही कायम राहिला. सोमवारी सेन्सेक्स 74 अंकांनी उंचावून 25,715.17 अंकांवर पोहोचला.
मुंबई : मुंबई शेअर बाजारात तेजीचा सपाटा सलग पाचव्या दिवशीही कायम राहिला. सोमवारी सेन्सेक्स 74 अंकांनी उंचावून 25,715.17 अंकांवर पोहोचला. उल्लेखनीय म्हणजे, ही गेल्या दोन आठवडय़ांची उच्चंकी पातळी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज व एचडीएफसी यासारख्या मोठय़ा कंपन्यांची चांगली कामगिरी व विदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा सातत्यपूर्ण प्रवाह यामुळे बाजार धारणोला बळ मिळाले.
ब्रोकर्सनी सांगितले की, व्यापक आर्थिक संकेतांमध्ये सुधारणा, मान्सूनमध्ये प्रगती व जागतिक बाजारातील सकारात्मक कल यामुळे बाजाराला बळ मिळाले.
मुंबई शेअर बाजाराचा 3क् शेअरचा समावेश असलेला सेन्सेक्स 25,776.54 अंकांच्या मजबुतीसह उघडल्यानंतर दिवसभराची उच्चंकी पातळी 25,861.15 अंकांर्पयत गेली. तथापि, नंतर झालेल्या नफाखोरीमुळे काही अंकांनी घसरून शेवटी सेन्सेक्स 73.61 अंक किंवा क्.29 टक्क्यांच्या वाढीने 25,715.17 अंकांवर बंद झाला. सलग पाचव्या सत्रंत सेन्सेक्स सकारात्मक कलासह बंद झाला. यापूर्वी 7 जुलै रोजी सेन्सेक्स 26,1क्क्.क्8 अंकांवर बंद झाला होता.
गेल्या पाच दिवसांत सेन्सेक्समध्ये 7क्8 अंकांचा लाभ नोंदला गेला. याचप्रमाणो, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही 2क्.3क् अंक किंवा क्.26 टक्क्यांच्या लाभासह 7,684.2क् अंकांवर बंद झाला.
आशियाई बाजार घसरणीच्या कलासह बंद झाला. चीन, हाँगकाँग आणि दक्षिण कोरियाच्या बाजारात क्.5 ते क्.29 टक्क्यांची घसरण नोंदली गेली. सिंगापूर व तैवानचा बाजार क्.11 ते क्.43 टक्क्यांनी वधारला. प्रारंभीच्या व्यवहारात युरोपीय बाजारही खालच्या पातळीवर होता.
सेन्सेक्सवरील 3क् शेअरमध्ये 13 कंपन्यांना लाभ झाला. एचडीएफसीचे शेअर 2.61 टक्के, आयटीसी 1.55 टक्के आणि अॅक्सिक बँकेला 1.1क् टक्क्यांनी वधारले. दुसरीकडे टाटा पॉवरचे शेअर 1.94 टक्के, गेल 1.86 टक्के, एसबीआय 1.62 टक्के, भेल 1.58 टक्के, स्टरलाईट 1.39 टक्के, इन्फोसिस 1.27 टक्के, एल अॅण्ड टी 1.24 टक्के व ओएनजीसी 1.13 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. (प्रतिनिधी)
4रिलायन्स इंडस्ट्रीजचा पहिल्या तिमाहीतील शुद्ध नफा अपेक्षेहून अधिक राहिला. कंपनीने शनिवारी याबाबतची आकडेवारी जाहीर केली. परिणामी सोमवारी कंपनीच्या शेअरमध्ये 2 टक्क्यांची वाढ झाली.
4याचप्रमाणो, एचडीएफसीच्याही निव्वळ नफ्यात वाढ नोंदली गेली. यामुळे कंपनीचे शेअर 3 टक्क्यांनी उंचावले. तथापि, जूनच्या तिमाहीत एचडीएफसी बँकेचा नफा 21 टक्क्यांनी वाढला असतानाही कंपनीच्या शेअरमध्ये घसरण नोंदली गेली.
4बोनान्झा पोर्टफोलिओच्या वरिष्ठ शोध विश्लेषक निधी सारस्वत म्हणाल्या, सेन्सेक्सवरील मोठय़ा कंपन्या विशेषत: एफएमसीजी कंपन्यांत झालेल्या निवडक मागणीने बाजारात खरेदीचा कल कायम राहिला.