आता नो कॅश, फक्त FASTag; १ जानेवारीपासून राष्ट्रीय टोलनाक्यांवर रोख टोलवसूली बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 04:30 PM2020-12-30T16:30:32+5:302020-12-30T16:32:42+5:30

जुन्या आणि नव्या सर्वच प्रकारच्या गाड्यांसाठी आता सरकारनं FASTag बंधनकारक करण्याचा घेतला आहे निर्णय.

FASTag mandatory from January 1 From how it works to who is exempted from use all your queries answered | आता नो कॅश, फक्त FASTag; १ जानेवारीपासून राष्ट्रीय टोलनाक्यांवर रोख टोलवसूली बंद

आता नो कॅश, फक्त FASTag; १ जानेवारीपासून राष्ट्रीय टोलनाक्यांवर रोख टोलवसूली बंद

Next
ठळक मुद्देजुन्या, नव्या सर्वच गाड्यांसाठी FASTag अनिवार्यटोल वसूली वाढेल आणि वाहनांच्या रांगाही कमी होईल, असा सरकारचा विश्वास

केंद्र सरकारनं जुन्या आणि नव्या सर्वच गाड्यांना आता FASTag अनिवार्य केला आहे. १ जानेवारी २०२१ पासून देशभरात हा नियम लागू होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयानं सर्व जुन्या गाड्यांनाही FASTag आता बंधनकारक केला आहे. तर दुसरीकडे NHAI नंदेखील १ जानेवारीपासून रोख रकमेद्वारे टोल वसूली बंद केली जाणार असल्याचं म्हटलं आहे. देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर आता यापुढे FASTag द्वारेच टोलवसूली होणार आहे. दरम्यान, यामुळे टोल वसूलीही वाढेल आणि वाहनांच्या लांबच लांब लागणाऱ्या रांगाही कमी होतील, असं सरकारचं म्हणणं आहे. 

कार, ट्रक, बस किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या खासगी आणि कमर्शिअल वाहनांना टोल नाक्यांवरून पुढे जाण्यासाठी आता FASTag आवश्यक असणार आहे. वाहन चालकांकडे FASTag खरेदीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. देशभरातील कोणत्याही टोल नाक्यांवरून वाहन चालकांना FASTag खरेदी करता येऊ शकतो. त्यासाठी केवळ चालकांना आपल्या गाडीच्या नोंदणीची कागदपत्रे दाखवावी लागणार आहेत. FASTag खरेदी करण्यासाठी ही केव्हायसी प्रक्रिया आहे. तर दुसरीकडे FASTag हा तुमच्या बँकेद्वारे, अॅमेझॉन, पेटीएम, एअरटेल पेमेंट बँकसारख्या ठिकाणांहूनही खरेदी करता येणार आहे. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, अॅक्सिस या बँकांमधूनही FASTag खरेदी करता येऊ शकतो.

काय असेल किंमत ?

FASTag ची किंमत ही दोन बाबींवर अवलंबून आहे. पहिली म्हणजे तुमचं वाहन हे कोणत्या श्रेणीतील आहे आणि दुसरी बाब म्हणजे तुम्ही FASTag कुठून विकत घेत आहात. प्रत्येक बँकेची FASTag साठी सिक्युरिटी डिपॉझिटसाठी निरनिराळी पॉलिसी आहे. जर तुम्ही पेटीएमवरून FASTag खरेदी करत असाल तर तो तुम्हाला ५०० रूपयांना मिळेल. यामधअये २५० रूपयांचं रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट आणि १५० रूपयांचा बॅलन्स देण्यात येतो. जर तुम्ही आयसीआयसीआय बँकेतून FASTag खरेदी केला तर त्यासाठी ९९ रूपयांची इश्यू फी आणि २०० रुपये डिपॉझिट म्हणून जमा करावं लागतं. 

कसं कराल रिचार्ज?

FASTag रिचार्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली म्हणजे ज्या बँकेतून तुम्ही ते घेतलं आहे त्याद्वारे तयार करण्यात आलेलं FASTag वॉलेट डाऊनलोड करा आणि इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे ते रिचार्ज करा. तर दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही पेटीएम, फोन पे सारख्या मोबाईल वॉलेटद्वारेही FASTag रिचार्ज करू शकता. तसंच अॅमेझॉन पे आणि गुगल पे वरही हा पर्याय उपलब्ध आहे.

Web Title: FASTag mandatory from January 1 From how it works to who is exempted from use all your queries answered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.