गतिमान एक्सप्रेस ११० मिनिटात पार करणार २०० किमी अंतर

By admin | Published: April 1, 2016 10:46 AM2016-04-01T10:46:41+5:302016-04-01T10:46:41+5:30

बहुप्रतिक्षित गतिमान एक्सप्रेसची पुढच्या आठवडयापासून सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. देशातील ही पहिली सेमी हाय-स्पीड ट्रेन आहे.

The fastest express will cross 200 km in 110 minutes | गतिमान एक्सप्रेस ११० मिनिटात पार करणार २०० किमी अंतर

गतिमान एक्सप्रेस ११० मिनिटात पार करणार २०० किमी अंतर

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १ - बहुप्रतिक्षित गतिमान एक्सप्रेसची पुढच्या आठवडयापासून सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. देशातील ही पहिली सेमी हाय-स्पीड ट्रेन आहे. दिल्ली-आग्रा मार्गावर १६० कि.मी. प्रतितास वेगाने धावणारी ही देशातील पहिली ट्रेन आहे. ११० मिनिटात ही ट्रेन २०० कि.मी. अंतर पार करणार आहे.
 
ही देशातील पहिली अशी ट्रेन आहे ज्यामध्ये विमानातील हवाई सुंदरीप्रमाणे ट्रेन सुंदरी असतील. ट्रायल रनसह या ट्रेनच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून, पुढच्या आठवडयात पाच एप्रिलला केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते या ट्रेनचे उदघाटन होण्याची शक्यता आहे असे रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. 
 
प्रवाशांना विमानात जशा उच्च दर्जाच्या सुविधा मिळतात तशाच खानपानापासून सर्व सुविधा या ट्रेनमध्ये देण्याचा प्रयत्न आहे. या ट्रेनच्या तिकीटासाठी शताब्दी एक्सप्रेसपेक्षा २५ टक्के जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. या ट्रेनमधील सुंदरी फूल देऊन प्रवाशाचे स्वागत करणार आहेत. 
 
या ट्रेनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. संपूर्णपणे वातानुकूलित असलेल्या या ट्रेनमध्ये चेअर कारसाठी ६९० रुपयाचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. एक्झिक्युटीव्ह क्लासमधून प्रवास करण्यासाठी १३६५ रुपये मोजावे लागतील. दिल्ली-आग्रा मार्गावर धावणा-या शताब्दी एक्सप्रेसचे चेअर कारचे शुल्क ५४० आणि एक्झिक्युटीव्ह क्लासचे शुल्क १०४० रुपये आहे. 
 

Web Title: The fastest express will cross 200 km in 110 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.