माजी सैनिकांचे २४ पासून उपोषण
By admin | Published: August 16, 2015 10:31 PM2015-08-16T22:31:57+5:302015-08-16T22:31:57+5:30
वन रँक वन पेन्शनच्या (ओआरओपी) मागणीसाठी जंतरमंतरवर आंदोलन पुकारणाऱ्या माजी सैनिकांनी २४ आॅगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे
Next
नवी दिल्ली : वन रँक वन पेन्शनच्या (ओआरओपी) मागणीसाठी जंतरमंतरवर आंदोलन पुकारणाऱ्या माजी सैनिकांनी २४ आॅगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठोस आश्वासन न दिल्यामुळे निराश झालेल्या माजी सैनिकांनी उपोषणाचे अस्त्र उपसण्याचा निर्णय घेतला.
माजी सैनिकांचे आंदोलन चालविणाऱ्या संयुक्त आघाडीचे माध्यम सल्लागार कर्नल (निवृत्त) अनिल कौल यांनी हा इशारा दिला. आतापर्यंत निदर्शकांनी साखळी उपोषण चालवले होते. मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात ही मागणी मान्य करण्यासाठी ठराविक मुदत देण्याचे टाळत चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे म्हटले होते.