तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यासाठी उपोषण

By admin | Published: April 15, 2016 01:55 AM2016-04-15T01:55:24+5:302016-04-15T22:46:43+5:30

येवला (वार्ताहर) तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या तलावासह नगरपालिका साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्यावा व बोकटे येथील भैरवनाथ यात्रेसाठी पालखेड आवर्तनाने पाणी द्यावे या मागणीसाठी शिवसेनेने येवला पालखेड कार्यालयासमोर गुरु वारी उपोषण केले. यशस्वी चर्चेनंतर उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले.

Fasting to fill the pond with full capacity | तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यासाठी उपोषण

तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यासाठी उपोषण

Next

येवला (वार्ताहर) तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या तलावासह नगरपालिका साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्यावा व बोकटे येथील भैरवनाथ यात्रेसाठी पालखेड आवर्तनाने पाणी द्यावे या मागणीसाठी शिवसेनेने येवला पालखेड कार्यालयासमोर गुरु वारी उपोषण केले. यशस्वी चर्चेनंतर उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले.
टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालखेडने ७०० क्युसेस ने पाणी सोडणार असल्याचे जाहीर केले होते. शहर साठवण तलावात केवळ ३५दलघफू पाणी व तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी १७दलघफू पाणी दिले. रायते, भाटगाव, सातारे येथील प्रासंगिक आरक्षित तलावात केवळ ४.५ दलघफू पाणी दिले. या तीनही तलावात ८४.५० दलघफू पाणी भरून देणे आवश्यक होते. परंतु केवळ ५६.५० दलघफू पाणी मिळाले. यात्रेसाठी दिले जाणारे पाणी खंडित केले. यामुळे संभाजीराजे पवार, जिल्हा बँकेचे चेअरमन नरेद्र दराडे, यांच्या नेतृत्वाखाली येवला पालखेड कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. झुंजार देशमुख, भास्कर कोंढरे, बापू काळे, साहेबराव सैद, धीरज परदेशी, जनार्दन खिल्लारे, चंद्रकांत शिंदे, रवी काळे, यांनी पाण्याची वस्तुस्थिती भाषणातून मांडली. सांयकाळच्या सुमारास तहसीलदार शरद मंडलिक व शाखाधिकारी एस. पी. दाणे यांनी उपोषणस्थळी धाव घेतल्यानंतर झालेल्या यशस्वी चर्चेनंतर उपोषण स्थगीत झाले.
फोटो-14 येवला ७
कॅप्शन : आंदोलनात सहभागी संभाजीराजे पवार, नरेद्र दराडे, झुंजार देशमुख, भास्कर कोंढरे, बापू काळे, साहेबराव सैद, धीरज परदेशी आदी.

Web Title: Fasting to fill the pond with full capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.