घरात घुसून मारहाण करणार्या पोलिसांवर कारवाई न झाल्यास उपोषण
By admin | Published: July 17, 2016 11:32 PM2016-07-17T23:32:30+5:302016-07-17T23:32:30+5:30
जळगाव: मध्यरात्री दीड वाजता घरात घुसून मारहाण करणार्या पिंपळगाव हरेश्वर येथील पोलिसांवर आठ दिवसात कारवाई न झाल्यास २५ जुलै रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर मुलाबाळांसह आमरण उपोषणास बसण्याचा इशारा चंदाबाई कमलसिंग चौधरी (रा.लोहारा, ता.पाचोरा) यांनी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे दिला आहे.
Next
ज गाव: मध्यरात्री दीड वाजता घरात घुसून मारहाण करणार्या पिंपळगाव हरेश्वर येथील पोलिसांवर आठ दिवसात कारवाई न झाल्यास २५ जुलै रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर मुलाबाळांसह आमरण उपोषणास बसण्याचा इशारा चंदाबाई कमलसिंग चौधरी (रा.लोहारा, ता.पाचोरा) यांनी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे दिला आहे. पिंपळगाव हरेश्वरचे सहायक निरीक्षक संदीप पाटील, लोहारा दूरक्षेत्राचे संजय पाटील, अनवर तडवी, दोन महिला कर्मचारी यांच्यासह अनोळखी ७ ते ८ जणांनी १६ मार्च रोजी लोहारा येथे घरात घुसून अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली. मध्यरात्री घरी येण्याचे कारण विचारले असता त्यांनी घर झडती घेण्याचे कारण सांगितले. त्यापैकी संजय पाटील हा कर्मचारी दारुच्या नशेत होता असेही निवेदनात म्हटले आहे. या प्रकाराची वारंवार वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार केली, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. ज्यांच्याकडून संरक्षणाची अपेक्षा आहे, त्यांच्यापासूनच धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आठ दिवसात या सर्वांवर गुन्हे दाखल झाले नाही तर अधिवेशन काळात २५ जुलैपासून मुंबईत आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.