फास्टटॅगद्वारे दरराेज ८० काेटी टाेल संकलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 06:02 AM2020-12-26T06:02:54+5:302020-12-26T06:03:18+5:30
Fasttag : फास्टटॅगच्या माध्यमातून प्रथमच दरराेजचे टाेल संकलन ८० काेटींपर्यंत पाेहाेचले आहे.
नवी दिल्ली : फास्टटॅगच्या माध्यमातून इलेक्ट्राॅनिक टाेल संकलन दरराेज ८० काेटी रुपयांपर्यंत वाढल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. आतापर्यंत २.२० काेटी फास्टटॅग वितरित करण्यात आले आहेत. फास्टटॅगच्या माध्यमातून प्रथमच दरराेजचे टाेल संकलन ८० काेटींपर्यंत पाेहाेचले आहे.
या माध्यमातून दरराेज विक्रमी ५० लाख व्यवहार हाेत असल्याची माहितीही प्राधिकरणाने दिली आहे. देशात १ जानेवारी २०२१ पासून सर्व वाहनांवर फास्टटॅग अनिवार्य करण्यात आले आहे. त्यादृष्टीने टाेलनाक्यांवर आवश्यक तरतुदी करण्यात आल्या असून फास्टटॅग वापरणाऱ्याचा वेळ आणि इंधनाची बचत
हाेत असल्याचेही प्राधिकरणाने सांगितले.