केरळमध्ये जंक फूडवर 'फॅट टॅक्स'

By admin | Published: July 9, 2016 09:40 AM2016-07-09T09:40:33+5:302016-07-09T10:53:23+5:30

केरळमध्ये जंक फूडवर १४.५ टक्के फॅट टॅक्स लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Fat tax on junk food in Kerala | केरळमध्ये जंक फूडवर 'फॅट टॅक्स'

केरळमध्ये जंक फूडवर 'फॅट टॅक्स'

Next
ऑनलाइन लोकमत
कोटी, दि. ९ - केरळमधील सत्ताधारी डाव्या आघाडीने यावर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी विधानसभेत सादर केला असून त्यातील महत्वपूर्ण बाब म्हणजे लागू करण्यात आलेला 'फॅट टॅक्स'...  जे ग्राहक नामांकित रेस्टॉरंट्समध्ये पिझ्झा, बर्गर, सँडविच, पास्ता असे 'जंक फूड' सदरात मोडणारे पदार्थ मागवतील त्यावर १४.५ टक्के टॅक्स लावण्यात येणार आहे. राज्य सरकारने या पदार्थांवर तब्बल ' १४.५ टक्के पॅट टॅक्स' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही प२केज्ड फूडवर ५ टक्के इतका करही लावण्यात येणार आहे. केरळचे अर्थमंत्री टी. एम. थॉमस यांनी सुधारित अर्थसंकल्प सादर करताना हा टॅक्स लागू करण्याचा मुद्दा मांडला असून आता जंक फूड खाणा-यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार असून रेस्टॉरंट्सच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम होईल हे निश्चित. 
केरळातील आर्थिक विकासदर घसरल्यामुळेच आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठीच ही 'फॅट टॅक्स'ची तरतूद करण्यात आली आहे. सरकारने यावर्षी ८०५ कोटी रुपयांचा कर संकलित करण्याचा निर्धार केला असून गव्हापासून बनवण्यात येणारे पदार्थ, तसेच बासमती तांदूळ आदींवरही कर लागू करण्यात आला आहे.  
दरम्यान या निर्णयामुळे सरकारच्‍या तिजोरीत वर्षाकाठी कमीत कमी 10 कोटी रुपयांची भर पडणार असल्याचे समजते.
हा 'फॅट टॅक्स' नामांकित रेस्टॉरंट्स तसेच मॅकडोनाल्ड्स, डॉमिनोज, पिझ्झा हट आदी नामांकित फूड चेन्सनाही लागू होणार आहे. या नियमांचे लवकरच कायद्यात रुपांतर करमअयात येणार असून ग्राहकांना मात्र चांगलाच भुर्दंड पडणार आहे. तसेच हॉटेल व्यवसायासाठीही ही चांगली बातमी नसल्याचे दिसत आहे. 'हा नियम वा तरतूद म्हणजे व्यवसाय-विरोधी आहे. यामुळे आमच्यावर पडणारा बोझा आम्ही ग्राहकांवर लादू  शकत नाही, याने सर्वांचेच नुकसान होईल' अशी प्रतिक्रिया रेस्टॉरंटच्या मालकांकडून व्यक्त होत आहे.
 
 'जंक फूड’ वाढवत आहे विविध आजार
दरम्यान आजच्या धावपळीच्या युगात जंक फूज खाणा-यांचे प्रमाण वाढले आहे. बैठे काम करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. साधारण २५ ते ३० टक्के श्रमजीवी रस्ते, कॅफे व इतर बाह्य ठिकाणांवरील जंक फूडवर अवलंबून राहतात. परिणामी, हे लोक लठ्ठपणा या आजारापासून पीडित आहेत. त्यांच्यामध्ये विविध आजारांचा धोका वाढला आहे. आयर्नच्या कमी सेवनासह अपुऱ्या आहारामुळे अ‍ॅनेमिया व जीवनसत्त्वाची कमतरता असण्याची प्रकरणे वाढली आहेत. एका सर्वेक्षणात २४ टक्के पुरुष व १९ टक्के स्त्रियांमध्ये जीवनसत्त्व (ब) ची कमतरता आढळून आली.
 इथे वाचा जंक फूड खाण्याचे तोटे :

 

Web Title: Fat tax on junk food in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.