एलपीजी सिलिंडरच्या स्फोटामुळे भीषण अपघात, मुलासह दोघांचा मृत्यू; अनेक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 08:33 PM2024-11-04T20:33:37+5:302024-11-04T20:33:48+5:30

हरयाणातील कैथलमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन मोठा स्फोट झाला आहे. यात एका मुलासह दोघांचा मृत्यू झाला.

Fatal accident due to LPG cylinder explosion, two dead, including a child; Many seriously injured | एलपीजी सिलिंडरच्या स्फोटामुळे भीषण अपघात, मुलासह दोघांचा मृत्यू; अनेक गंभीर जखमी

एलपीजी सिलिंडरच्या स्फोटामुळे भीषण अपघात, मुलासह दोघांचा मृत्यू; अनेक गंभीर जखमी

हरयाणाच्या कैथलमध्ये एलपीजी सिलिंडरच्या स्फोटात एका मुलासह दोन जणांचा मृत्यू झाला. चीका शहरातील एका घरात एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन सोमवारी मोठी दुर्घटना घडली. दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती पोलिसांनी दिली.

सर्वजण झोपले असताना ही घटना घडली. स्फोटामुळे घराचे नुकसान झाले असून जवळच्या घरांच्या खिडक्यांच्या काचाही तुटल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक सुरेश कुमार यांनी सांगितले की, मृतांपैकी एक १९ वर्षीय महिला असून दुसरी अडीच वर्षांची मुलगी आहे.

जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना पतियाळा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. स्फोटाचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी कुटुंबाला वाचवण्यासाठी धाव घेतली. पोलिसांनी सांगितले की, स्फोटाचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या एका टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आली आहे.

Web Title: Fatal accident due to LPG cylinder explosion, two dead, including a child; Many seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.